Home | National | Other State | The young man, who was on a highway power line in Bulandshahar because of his fathers death

हायव्होल्टेज इलेक्ट्रीक लाइनवर तरुणाला पाहून उडाली खळबळ, खाली उतरवताना पोलिसांना फुटला घाम; खाली उतरल्यानंतर त्याने सांगितले आपले दुःख

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 11:37 AM IST

तासभर चाललेल्या या तमाशाचा व्हिडीओ व्हायरल

  • The young man, who was on a highway power line in Bulandshahar because of his fathers death

    बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - खुर्जा जंक्शन भागात एक युवक हायटेंशन इलेक्ट्रीक लाइनवर चढल्यामुळे याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. युवकाला पाहताच स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी वीजपुरवठा खंडीत केला आणि अथक परिश्रमानंतर तरूणाला खाली उतरवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    > भूतगडी भागात राहणारा हरिकेश (32 वर्षे) दारूच्या आहारी गेलेला आहे. बुधवारी सकाळी भागात असलेल्या हायटेंशन इलेक्ट्रीक लाइनवर चढल्यामुळे तेथील लोकांमध्ये एकज खळबळ उडाली होती. त्यांनी तात्काळ पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा खंडीत केला आणि युवकाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तरुणाने खाली उतरायचे सोडून चक्क हायटेंशन इलेक्ट्रीक लाइनवर चालण्यास सुरूवात केली. हे बघितल्यानंतर लोकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली. एक तास चाललेल्या तमाशानंतर युवक खाली उतरला.


    > पोलिसांनी तरुणाची चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरात दोन मुले असून मोठा मुलगा सोबत राहत नाही. यामुळे जगण्यात काही अर्थ नाही. अशावेळी आत्महत्या करण्यासाठी तो लाइनवर चढला.

Trending