आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमाननगरात माथेफिरूने जाळल्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगरात गुरूवारी मध्यरात्री माथेफिरूने घरासमोर उभ्या असलेल्या घरमालक व भाडेकरू यांच्या दोन दुचाकी जाळल्या आहेत. एमआयडीसी पोलिसांनी सकाळी घटनास्थळी येऊन पाहणी केली. 

 

अपार्टमेंटमध्ये व घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी जाळण्याचे लोण शहरात पसरले आहे. गुरूवारी मध्यरात्री हनुमान नगरात जिमखान्याजवळ राहणारे संजय रंगराव रंगारी यांची एम.एच.-१९, ए.आर.-६९०२ या क्रमांकाची दुचाकी माथेफिरूने जाळली आहे. बँकेत नोकरीला असलेली पूजा कोळी ही युवती रंगारी यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहते. त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन्ही दुचाकी जाळण्यात आल्याचा प्रकार मध्यरात्री निदर्शनास आला. नागरिकांनी या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिसांना कळवले. दुचाकी जाळल्यामुळे नागरिकांत भिती आहे.

 

दीड महिन्यात ८ दुचाकींची राखरांगोळी 
दीड महिन्यात माथेफिरूंनी आठ दुचाकी जाळल्या आहेत. यात २४ डिसेंबर रोजी कांचननगर व शिवाजीनगरात प्रत्येकी २ दुचाकी जाळण्यात आल्या हाेत्या. तर ९ जानेवारी रोजी संत मिराबाई नगरात एक दुचाकी जाळली हाेती. त्यानंतर पिंप्राळ्यातही एक दुचाकी जाळण्यात आली. एमआयडीसीत गुरूवारी मध्यरात्री दोन दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...