आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य आत्मसात करा; मग नोकरी मिळेलच: मुख्‍यमंत्री फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आजमितीस बेरोजगारीचे मुख्य कारण युवकांमधील कौशल्याची कमतरता आहे.  पूर्वी अकुशल स्वरुपाच्या नोकऱ्या होत्या. आजच्या औद्योगिक व्यवस्थेत अकुशल नोकऱ्या नाहीत. अकुशलतेमुळे नोकऱ्या मिळत नसल्याने ओरडही होते. प्रत्यक्षात उद्योगांना कुशल आणि प्रशिक्षित मानव संसाधनांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. पण ते मिळत नसून, तुम्ही दहावी-बारावी शिकलात, नापास झाला यापेक्षाही तुम्ही कुठले कौशल्य आत्मसात केले, तुमच्यात कुठले कौशल्य आहे, याला अत्यंत महत्व असल्याने तरुणांनी कौशल्य आत्मसात करावे. नोकरी सहज मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

 

मागील वर्षातील सहा महिन्यात ८ लाख रोजगाराची निर्मिती झाल्याचेही त्यांनी जाहीर केले.  
ओझर टाऊनशिप येथील कम्युनिटी हॉल येथे उद्योग विभाग आणि सीआआयच्या संयुक्त विद्यमाने आमदार अनिल कदम यांच्या पुढाकारातून बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्योगांना कुशल व प्रशिक्षित असलेल्या मानव संसाधनांची मोठी आवश्यकता आहे. तरुणांनीही नोकरी हवी आहे. उद्योग आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरुणांना कौशल्य शिक्षण देत उद्योग आणि बेरोजगारांतील दरी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यात आलेल्या सर्व युवकांना ऑफर लेटर देण्यात आले होते. पिछाडीवर पडलेला महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात अव्वल असून परदेशी थेट गुंतवणूक, उद्योग, रोजगारात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. नुकत्याच जाहीर आकडेवारीवरून मागील वर्षीच्या सहा महिन्यातील सर्वात जास्त रोजगार महाराष्ट्रात तयार झाले. ८ लाख लोकांना मागील वर्षी रोजगार मिळाला. हा ईफीएफ लागू असलेल्या सेक्टरमधील रोजगार आहे. इन्फॉर्मल सेक्टरमधील रोजगाराची संख्याही वेगळी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाशिकलाही या मेळाव्याचा फायदा होणार अाहे. उद्योग विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी उपक्रमाची माहिती विशद करत पुणे, मुंबईच्या मेळाव्याची यशस्वीता सांगितली. चार वर्षात राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, प्रा. देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, महापौर रंजना भानसी उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...