Crime / सरपंचाविरोधात फेसबुक पोस्ट टाकल्याने तरुणास मारहाण करून अज्ञातांनी जिवंत जाळले

मृतदेह सेलू-वालूर रस्त्यावर पडून, वाहतूक झाली जाम
 

प्रतिनिधी

Jun 16,2019 09:14:00 AM IST

सेलू - सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सतीश बरसाले या तरुणास अज्ञात लोकांनी बेदम मारहाण करून जिवंत जाळल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सेलू-वालूर रस्त्यावरील ब्राह्मणगाव येथील कॅनॉलजवळ उघडकीस अाला. या वेळी रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे वाहतूक सुमारे पाच तास बंद होती. मृतदेह दुपारी २.३० वाजेपर्यंत पडून हाेता. नंतर ताे सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.


सरपंचाविरुद्ध फेसबुक पोस्ट : मृत सतीश दत्ता बरसाले (३५) या तरुणाने १४ जून रोजी सकाळी १०.४२ वाजता आपल्या फेसबुक अकाउंटवरून स्वत:च्या हस्ताक्षरात पोस्ट टाकली होती. “गावच्या सरपंचांचे कुटुंबीय आमच्याशी नाहक भांडतात. स्वत:च डोके फोडून घेऊन आळ घालतात. माझ्या परिवाराला मारहाण करतात. १४ जून रोजी असाच प्रकार त्यांनी केला,’ असे पोस्टमध्ये नमूद होते.

X
COMMENT