Home | Maharashtra | Mumbai | Accuse Arrested For Threatning Actress Shikha Mishra On Social Media.

भोजपूरी अॅक्‍ट्रेसला बलात्‍काराची धमकी देणा-या युवकास मुंबईत अटक, आरोपी 2 मुलांचा बाप

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Aug 06, 2018, 07:02 PM IST

भोजपूरी अॅक्‍ट्रेस शिखा मिश्राला बलात्‍काराची धमकी देणा-या युवकास मुंबईत अटक करण्‍यात आली आहे.

 • Accuse Arrested For Threatning Actress Shikha Mishra On Social Media.

  मुंबई - भोजपूरी अॅक्‍ट्रेस शिखा मिश्राला बलात्‍काराची धमकी देणा-या युवकास मुंबईत अटक करण्‍यात आली आहे. युवकाने सोशल मीडियावर तसेच फोन करून अॅक्‍ट्रेस शिखा मिश्राला बलात्‍काराची धमकी दिली होती. आरोपी मागील दोन महिन्‍यांपासून अभिनेत्रीला त्रास देत होता. अभिनेत्रीने अनेक टीव्‍ही सीरियल्‍स व सिनेमांत काम केले आहे.

  काय आहे आरोप?
  - अॅक्‍ट्रेस शिखा मिश्राने सांगितले आहे की, 'संदीप पांडे नावाचा युवक मा‍गील दोन महिन्‍यांपासून सोशल मीडियाद्वारे मला घाणेरडे मॅसेजेस पाठवत आहे. इतकेच नव्‍हे तर 2 ऑगस्‍टरोजी युवकाने माझे अपहरण व बलात्‍कार करण्‍याचीही धमकी दिली. यानंतर माझ्या पतीनेही हे सर्व थांबवण्‍याचा त्‍याला इशारा दिला. मात्र युवकावर त्‍याचा काहीही फरक पडला नाही व त्‍याने माझ्या पतीलाही धमकावले.' युवकाचे अनेक कॉल रेकॉर्ड्स पोलिसांकडे सोपवल्‍याची माहिती शिखाने दिली.


  दोन मुलांचा बाप आहे आरोपी
  याप्रकरणाचा तपास करणा-या एसीपी राजाराम मांडगे यांनी सांगितले की, पीडितेच्‍या तक्रारीनंतर रविवारी रात्री युवकास अटक करण्‍यात आली आहे. आरोपी विवाहित असून दोन मुलांचा बाप आहे. एका बांधकाम कंपनीत तो काम करतो. वाशीतून आरोपीला अटक करण्‍यात आली असून पुढील तपास मलाड पोलिस करत आहेत.


  या सीरियल्‍समध्‍ये अॅक्‍ट्रेसने केले आहे काम
  अॅक्‍ट्रेस शिखाने 'किस्‍मत कनेक्‍शन', 'जिंदगी कैसी', 'एक पहेली' या सीरियल्‍समध्‍ये लीड रोल केला आहे. तसेच 6हून अधिक भोजपूरी सिनेमातही शिखाने काम केले आहे. नूकतेच तिचा एका व्‍यवसायिकासोबत विवाह झाला. शिखा सध्‍या मराठी आणि भोजपूरी सिनेमे प्रोड्यूस करते.

Trending