Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Theft of 15 lakhs of rupees in Shirdi Bhaktanivas

शिर्डीतील भक्तनिवासमधून १५ लाखांचा ऐवज लांबवला

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 11:46 AM IST

साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासमधून ठाणे येथील साईभक्ताचा सुमारे १५ लाखांचा ऐवज चोरीला गेला.

  • Theft of 15 lakhs of rupees in Shirdi Bhaktanivas

    शिर्डी- साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासमधून ठाणे येथील साईभक्ताचा सुमारे १५ लाखांचा ऐवज चोरीला गेला. हा प्रकार सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.


    ठाणे येथील हेमंत पाटील हे साईदर्शनासाठी आले होते. बरोबर त्यांचा एक नातेवाईक होता. त्यांनी नेहमीप्रमाणे द्वारावती भक्तनिवासमध्ये १४३ नंबरची खोली घेतली. सोमवारी सकाळी त्यांनी आंघोळ केली. भांग पाडण्यासाठी कंगवा नसल्याने त्यांनी पँटच्या खिशातून पैसे काढून तेथे असलेल्या एकाला कंगवा आणण्यासाठी पाठवले. त्याने कंगवा आणून दिला.

    पाटील फोनवर बोलत असताना दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पँट लंपास केली. काही वेळानंतर पँट गायब झाल्याचे लक्षात आहे. त्यांनी भक्तनिवासच्या काऊंटरवर याबाबत माहिती दिली. साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, शिर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोन्याचा गोफ, अंगठी असे ५२ तोळ्यांचे सोन्याचे दागीने व ४० हजारांची रोकड पँटमध्ये होती. या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. संस्थानने तातडीने सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी साईसंस्थानच्या पाचशे रुम भक्तनिवासात चोरीच्या अशा घटना घडल्या आहेत.

Trending