आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच रात्री दोन घरे फोडून 35 हजारांचा ऐवज लंपास; घाटपुरी नाका परिसरात चोरट्यांची दहशत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- थंडीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री घाटपुरी नाका परिसरातील दोन घरे फोडून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात चाेरट्यांची दहशत पसरली आहे. यावेळी चोरट्यांनी एका घरातून रोख रकमेसह ३५ हजारांचा माल लंपास केला. तर दुसऱ्या घराचे मालक हे बाहेर गावी गेल्याने त्यांच्या घरातून किती माल चोरीस गेला, याची माहिती मिळू शकली नाही. या दोन्ही घटना आज १० जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आल्या. 

 

शहरातील घाटपुरी नाका येथील रहिवासी दिलीप मुरलीधर जाधव हे काल ९ जानेवारी रोजी रात्री एका खोलीत कुटूंबासह झोपले होते. दरम्यान रात्रीचे सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आता प्रवेश केला. सर्व प्रथम चोरट्यांनी जाधव कुटूंब ज्या खोलीत झोपले होते, त्या खोलीचे दार बाहेरून बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या खोलीतील कपाट व पँटच्या खिशातील रोख रककम असा एकूण ३५ हजारांचा माल लंपास केला. दरम्यान गुरुवारी सकाळी जाधव कुटूंब झोपेतून उठले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शिवाजी नगर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी चोरीची घटना याच भागातील रहिवासी देविदास कोकाटे यांच्या घरी घडली. कोकोट हे बाहेरगावी गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या घटनेची माहिती कोकाटे यांनी शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. परंतु किती रुपयाचा माल चोरीस गेला, याची माहिती मिळाली नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...