आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखान्यातून साड्यांसह तीन लाख लांबविले; अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहरातील हाजीनगर परिसरात असलेल्या सिल्क साड्यांच्या कारखान्यातून सुमारे दोन लाख ९२ हजारांची रोकड आणि ५० सिल्क साडी लांबवल्या. घटनेबद्दल चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मागवलेल्या श्वानने पोलिसांना काही अंतरापर्यत माग ही दाखविला. 

 

फिरदोसनगरातील जामा मशिद परिसरात राहणारे अख्तर हुसेन अब्दुल हई ( वय ४३) यांचा हाजीनगरातील प्लॉट न २५ या ठिकाणी सिल्क आणि फॅब्रिक्स साड्याचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे याठिकाणी कामे झाल्यानंतर रात्री साडी कारखान्याला कुलूप लावून ते घरी गेलेत. यानंतर सकाळी त्यांना शेजारी असलेल्या काहींनी कळविले की, कारखान्याचे कुलूप तुटलेले असून चोरीचा प्रयत्न दिसतो आहे.
 
त्यामुळे अख्तर हुसेन हे सकाळी कारखान्यात आले असता, त्यांना कारखान्यात चोरी झाल्याचे समजले. या वेळी कपाट व ड्राव्हर तपासून पाहिला असता त्यातील सुमारे दोन लाख ९२ हजार ५०० रुपयांची रोकड नव्हती. तसेच साड्याच्या गठ्ठ्यांमधून सुमारे ५० नववारी साड्याही लांबवल्या होत्या. चोरीस गेलेल्या साड्या सिल्क फॅबिक्सच्या आहेत. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. काहीवेळातच चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी हे पथकासह दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला परंतु चोरट्यांचा माग त्यांना मिळाला नाही. याशिवाय मुख्यालयातून श्वान पथक बोलावण्यात आले. जॅक या श्नान सोबत पोलिस कर्मचारी राजू जाधव व मंगळे हे होते. तसेच ठसे तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अख्तर हुसेन अब्दुल हई यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे, असे पाेलिसांनी सांगितले. 

 

जॅककडून आशा 
श्वान पथकात काही महिन्यांपूर्वी दाखल झालेला जॅक याची आजवरची कारकीर्द ही धडाकेबाज राहिली आहे. गेल्या महिन्यात गरुड कॉम्लेक्समधील मेडिकल व झाशी राणी चौकाजवळील एका कृ़षी केंद्रात झालेली चोरी उघडकीस आणली होती. एवढेच नव्हे तर सहा महिन्यांपूर्वी देवपूर पोलिस ठाण्याजवळील चोरी व चोरट्यांपर्यंतचा माग जॅकने दाखविला होता. त्यामुळे या गुन्ह्यातही जॅक याची पोलिसांना मदत होणार आहे. अशी पोलिसांना अपेक्षा आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...