आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत कचरा डेपाेत बनवले थीम पार्क ; एकोणावीस काेटींचा प्रकल्प भंगाराच्या वापरामुळे 7.5 काेटींत पूर्ण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली| दिल्लीत एक थीम पार्क तयार केला गेला अाहे. ज्यात जगातील सात आश्चर्ये एकाच ठिकाणी मिळतील. विशेष म्हणजे सर्वच आश्चर्ये भंगारातून बनवली गेली अाहेत. दक्षिण दिल्ली महानगरपालिका निझामुद्दीन मेट्रो स्टेशनजवळील जमिनीस हिरवीगार करू इच्छित हाेती. त्यामुळे थीम पार्क बनवण्याची याेजना तयार केली. त्यासाठी १९ काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली हाेती. थीम पार्क विटा व दगडांचा वापर करून पूर्ण करण्यात येणार हाेते. परंतु स्टाेअर रूममध्ये भंगारातील सायकलपासून स्ट्रीट लाइटचा खांबापर्यंत, नटबाेल्ट, टीन शेड पडले अाहे. हे सांभाळणे माेठे कठीण झाले हाेते. त्यानंतर थीम पार्क भंगाराचा वापर करून करण्याचा निर्णय घेण्यात अाला. थीम पार्क तयार करण्यासाठी सात कलाकारांच्या ६० जणांच्या टीमने सहा महिने प्रयत्न केले. भंगाराचा वापर करून थीम पार्क तयार केल्यामुळे १९ काेटींचा हाेणारा खर्च ११.५ काेटी रुपयांनी कमी हाेऊन साडेसात काेटी रुपयांवर अाला. अाता याचे शनिवारी उद्घाटन हाेणार अाहे. 

 

७० फुटांच्या अायफेल टॉवरपासून ताजमहालापर्यंत सर्वकाही 
साऊथ-ईस्ट दिल्लीतील सराय काले खाजवळ २ हेक्टर क्षेत्रात पार्क वसवण्यात अाले अाहे. त्यात अाग्र्याचा ताजमहाल, इजिप्तचा ग्रेट पिरॅमिड्स, ७० फूट उंच फ्रान्समधील पॅरिसमध्ये असलेले अायफेल टाॅवरची प्रतिकृती अमेरिकेतील न्यूयाॅर्कमधील स्टॅचू अाॅफ लिबर्टी, ब्राझीलमधील क्राइस्ट दी रिडीमर, इटलीतील लिनिंग टाॅवर अाॅफ पिसा व कॉलेसियम अॅम्फी थिएटरची प्रतिकृती तयार केली अाहे. या पार्कमध्ये १५० टन भंगार (लाेखंड व स्टील) वापरण्यात अाला अाहेे. सातमधील चार टाॅवरची निर्मिती सायकलच्या स्पेअर पार्ट््सने तयार केली अाहे. 


 

बातम्या आणखी आहेत...