आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुपर ब्लड वुल्फ मून'बाबत जगभरात आहेत अनेक अंधश्रद्धा, ब्लड मूनमुळे मोठी आपत्ती येणार असल्याचा केला जातो दावा 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - फक्त भारतच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये चंद्रग्रहणाबाबत अनेक मान्यता आणि त्याच्याशी संबंधित अफवा अशतात. 21 जानेवारीच्या चंद्रग्रहणाबाबतही अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. यावेळी झालेल्या चंद्रग्रहणामुळे अनेक देशांत चंद्र लाल रंगाचा दिसला. त्याला सुपर वुल्फ ब्लड मून म्हटले जाते. काही लोकांच्या मते लाल चंद्र संकटाला आमंत्रण देतो. उत्तर/दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत हे चंद्रग्रहण दिसले. भारतात मात्र ते दिसले नाही. 


- कॉन्सपरसी थेअरिस्टने केलेल्या दाव्यानुसार या ग्रहणाबरोबर दिसणारा ब्लड मून त्याचा परिणाम नक्की दाखवतो. यामुळे जगभरात नकोशा असलेल्या दुर्घटना घडू लागतील. 
- प्राचीन अमेरिकेच्या काही भागांत पूर्वीच्या काळी वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला वुल्फ मून म्हटले जात होते. त्याआधारे जानेवारीतील पौर्णिमा आणि त्यादिवशी चंद्र धरतीच्या जवळ असल्यामुळे याला असे नाव देण्यात आलेले आहे. 

- वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहता ही खगोलीय घटना वाटत असली तरी अनेक लोक याला अशुभ समजतात. जगातील अनेक संस्कृतींनी याचा संबंध धर्मग्रंथांशी जोडला आहे. कॉन्सपरेसी थेअरिस्टचा असा दावा आहे की, बायबलमध्ये ब्लड मून आणि धरतीच्या विनाशाबाबत लिहिले आहे. अशी अख्यायिका आहे की, एका अंतराळातील एका जॅगवारने चंद्रावर हल्ला करून त्याला खाल्ले होते. त्यामुळे तो रक्तासारखा लाल झाला होता. त्यामुळे चंद्र लाल होणे हा भविष्यातील अप्रिय घटनांचा संकेत समजला जातो. 

 

पुढे वाचा, पृथ्वीच्या किती जवळ असतो चंद्र आणि का दिसतो लाल.. 

बातम्या आणखी आहेत...