गुडलक / जीवनात सुख-शांतीसाठी प्रत्येकाने अवश्य करावे हे 4 काम

तुमच्या आयुष्यतही वारंवार समस्या चालूच राहत असतील तर सकाळी-सकाळी सोपे काम करून तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता....

Sep 23,2019 12:10:00 AM IST

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी येत आणि जात राहतात. परंतु काही लोकांच्या जीवनात नेहमी अडचणी येतच राहतात. तुमच्या आयुष्यतही वारंवार समस्या चालूच राहत असतील तर सकाळी-सकाळी सोपे काम करून तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार हे काम अत्यंत सोपे असून कोणताही व्यक्ती करू शकतो. या उपायांनी देवाची कृपा प्राप्त होते आणि दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकते.


1. रोज सकाळी उठताच भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करावे आणि 5 वेळेस 'श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम:' मंत्राचा उच्चार करावा. यामुळे दुःख, क्लेश, भीती, निराशा आणि धन संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी गोवल्लभाय स्वाहा मंत्राचा 5 वेळेस उच्चार केल्याने दुर्भाग्य दूर होते.


2. सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे
सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने अर्घ्य द्यावे. यामुळे तुमच्यावर सदैव पितरांची कृपा राहील. तांब्याच्या पाण्यामध्ये कुंकू आणि लाल फुल अवश्य असावे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात.


3. गायत्री मंत्राचा जप करावा
रोज सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. यामुळे तुमची काम करण्याची क्षमता वाढेल आणि विकास होईल.
ऊं भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।


4. तुळशीजवळ दिवा लावावा
सकाळी पूजा केल्यानंतर तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा अवश्य लावावा. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करू शकत नाही.

X