आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या ६३ वर्षांत लाेकसभेत ८४७० खासदार, पैकी फक्त ४०० मुस्लिम; १९८० साली सर्वाधिक उमेदवार  

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भारतात सन १९५१ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा ४८९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४४ मुस्लिम पुरुषांना उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी फक्त १५ खासदारच निवडून आले होते. दरम्यान, १९५१ पासून तर २०१४ पर्यंत लोकसभेच्या १६ निवडणुका झाल्या असून या ६३ वर्षांत भारतात केवळ ४०० मुस्लिम उमेदवारांना लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली असल्याचा अहवाल प्रा. डॉ. वखार शेख यांनी तयार केला आहे.    

 


लाेकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. सन २०१४ पर्यंत म्हणजे एकूण १६ लाेकसभांमध्ये ८ हजार ४७० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.  यात भारतात ६ हजार ६१ मुस्लिम बांधवांना विविध पक्षांतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापैकी ४०० मुस्लिम हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. यात पुरुषांचे प्रमाण हे ८ ते ९ टक्के इतके आहे. प्रा. शेख यांच्या अहवालानुसार आतापर्यंत सर्वाधिक उमेदवारी ही १९९६ साली देण्यात आली होती. यावर्षी ९५५ मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्यात आली, तर त्यानंतर २०१४ साली ८४१ उमेदवारांना संधी दिली होती.    

 

३ टक्केच मुस्लिम महिला खासदार    

तापर्यंत भारतात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत २२९ महिलांना पक्षांतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी केवळ १८ महिलाच खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. इतर महिलांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३ टक्के इतकेच आहे. १६ निवडणुकांमधून ५ निवडणुकांमध्ये एकही मुस्लिम महिला उमेदवार निवडून आलेली नाही, तर ६ निवडणुकीत केवळ १ टक्का महिला निवडून आल्या आहेत.      
 

 

१९८० साली सर्वाधिक उमेदवार    
निवडणुकीत सन १९८० मध्ये सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले. यावर्षी ४१ उमेदवार निवडून आले होते. यात ४० पुरुष तर १ महिला यांचा समावेश होता, तर १९५१ साली १५ सर्वांत कमी उमेदवार निवडून आले आहेत.