सय्यद मोदी बॅडमिंटन / प्रत्येक खेळाडूच्या विजयामागे अनेक जण असतात, त्यामुळे 'मी'च्या जागी 'आम्ही' असे बोलते : मारिन

  • स्पेनची कॅरोलिना मारिन महिला एकेरीची चॅम्पियन; सौरभ वर्मा उपविजेता
  • मारिन सोशल मीडियात 'I' च्या जागी 'We' लिहिते; मारिनची 8 ते 10 जणांची टीम आहे
  • ऑलिम्पिक झाल्यावर पीबीएलचा विचार करेल

अभिषेक त्रिपाठी

Dec 02,2019 09:19:00 AM IST

​​​​​​लखनऊ : स्पेनची बॅडमिंटन स्टार कॅरोलिना मारिनने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला एकेरीचा किताब जिंकला. ती पहिल्यांदा येथे चॅम्पियन बनली. मारिनने म्हटले की - 'भारतात मला खेळण्यास नेहमी आवडते. येथील प्रेक्षक खूप प्रोत्साहन देतात. आता ऑलिम्पिक खेळल्यानंतर प्रीमियर बॅडमिंटन लीगचा (पीबीएल) विचार करेल.' मारिन सोशल मीडियावर किंवा खेळाबाबतीत बोलताना नेहमी I च्या जागी We लिहिते व बोलते. ती म्हटले, खेळाडूंच्या विजयामागे अनेक जण असतात, त्यामुळे 'मी'च्या जागी 'आम्ही' बोलायला आवडते. तिच्या संघात ८ ते १० जण आहेत. मारिन बाबत आणखी...


मी जागतिक विजेता झाल्यानंतर स्पेनमध्ये बॅडमिंटन लोकप्रिय झाले


विजय नेहमीच चांगला वाटतो. मात्र प्रत्येक खेळाडूच्या एका विजयामागे अनेकांचा हात असतो. त्यामुळे खेळाबाबत बोलताना 'मी'च्या जागी 'आम्ही' शब्द वापरते. मी केवळ कोर्टवर खेळते, मात्र माझी टीम खूप मेहनत घेते. त्यात दोन मानसोपचारतज्ञाचा समावेश आहे. एक वैयक्तिक जीवनात मदत करतात आणि एक खेळाबाबतीत. त्यासह तांत्रिक सहायक, फिजिओ, व्हिडिओ टीमसोबत काम करते. दुखापतीनंतर कोर्टवर परतण्यासाठी या सर्वांनी मला खूप मोठी मदत केली. दुखापतीदरम्यान बॅडमिंटनची आठवण येत होती, मात्र कोणतीही घाई नव्हती. त्यासाठी वेळ लागतो हे माहिती आहे, मी संपूर्ण लक्ष्य रिहॅबर प्रक्रियेवर केंद्रित केले. प्रक्रिया योग्य झाल्यास, प्रदर्शन, क्रमवारी सर्व गोष्टी चांगल्या होतात.


आता कोर्टवर परतल्याचा आनंद होतोय. विशेष: भारतात खेळताना. येथे खेळायला नेहमी आवडते. आता पुढील ऑलिम्पिकवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यानंतर आपल्या टीमसोबत चर्चा करेन आणि फिटनेस पाहून पीबीएल खेळण्याचा विचार करेल. भारतात खेळाच्या बाबतीत अनेक गोष्टी सोप्या आहेत. स्पेनसारख्या देशात फुटबॉल व टेनिसची लोकप्रियता आहे, तेथे बॅडमिंटन खेळाडू म्हणून सुरुवात करणे सोपे नव्हते. मात्र, भारतात परिस्थिती वेगळी आहे. मी मोठ्या मोठ्या स्पर्धेत पदके जिंकली, त्यानंतर आमच्याकडे बॅडमिंटनची संस्कृती सुरू झाली. आता तर आम्ही राष्ट्रीय अकादमी बनवून खेळाडू तयार करत आहोत. (सायना, सिंधूपैकी कठीण कोण विचारल्यावर) खेळात प्रत्येक खेळासाठी चांगला वाईट दिवस असतोच. जेव्हा त्यांचा चांगला दिवस असला, तेव्हा ते कोणावरही वरचढ ठरतात.


मारिनचा दुखापतीतून परतल्यानंतर दुसरा किताब


ऑलिम्पिक चॅम्पियन मारिनने थायलंडच्या फितियापोर्न चाईवानला २१-१२, २१-१६ ने हरवले. मारिन ४० मिनिटात जिंकली. दुखापतीननंतर पुनरागमन करत तिचा हा दुसरा किताब ठरला. मारिन जानेवारीत इंडोनेशिया मास्टर्सच्या फायनलदरम्यान जखमी झाली होती. त्यानंतर ती ७ महिने कोर्टपासून लांब राहिली. दुसरीकडे, पुरुष एकेरीत भारताचा सौरभ वर्मा उपविजेता ठरला. जागतिक क्रमवारीतील ३६ व्या स्थानावरील सौरभला फायनलमध्ये आठव्या मानांकित तैपेईच्या वांग जू वेईकडून १५-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. सौरभ ४८ मिनिटांत हारला. जू वेई आणि सौरभ यांच्यात तीन सामने झाले. वेईने दुसऱ्यांदा सौरभला हरवले. मारिन आणि जू वेईने पहिल्यांदा या स्पर्धेत किताब जिंकला. मिश्र दुहेरीत रशियाच्या जोडीने आणि महिला दुहेरीत कोरियाच्या जोडीने विजेतेपद मिळवले.

X
COMMENT