आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखाेरांचे पीक अमाप, मात्र कारवाई चार-दाेन जणांवरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना, भाजप युती झाली आणि दाेन्ही पक्षातील अनेक नेत्यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले. काँग्रेस- राष्ट्रवादीतही तीच गत झाली. या चारही पक्षातील नेत्यांनी बंडाचे निशाण हाती घेेत उमेदवारी दाखल केली. पक्ष नेतृत्वाने अनेकदा समजावून सांगून, इशारे देऊनही त्यांनी उमेदवारी माघारी घेतली नाही. त्यामुळे भाजपने गुरुवारी चार बंडखाेरांची तर काँग्रेसने दाेन बंडखाेरांची पक्षातून हकालपट्टी केली. प्रत्यक्षात चारही पक्षांचे मिळून ५० हून अधिक बंडखाेर मैदानात आहेत, कारवाई मात्र केवळ सहा जणांवर झाली. शिवसेना व राष्ट्रवादी तर फक्त इशारेच देण्यात मग्न आहे. एकूणच बंडखाेरीला पक्षातूनच अप्रत्यक्ष पाठिंबा तर नाही ना? अशी शंका काही मतदारसंघात उपस्थित हाेत आहे. भाजपने चरण वाघमारे (तुमसर), गीता जैन (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी चिंचवड) आणि दिलीप देशमुख (अहमदपूर, लातूर) यांची तर काँग्रेसने रामरतन बापू राऊत (आमगाव. जि. गोंदिया) आणि सेवकभाऊ वाघाये (साकोली, जि. भंडारा) यांची पक्षातून हकालपट्टी केली. 
 

शिवसेनेचे या बंडखाेरांना अभय
तृप्ती सावंत (वांद्रे), संतोष ढवळे (यवतमाळ), आशिष जैस्वाल (रामटेक), धनंजय बोडारे (कल्याण पूर्व), राहुल कलाटे (चिंचवड), विशाल धनावडे (कसबा), नारायण पाटील (करमाळा), महेश कोठे (सोलापूर मध्य),  चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), बदामराव पंडित (गेवराई).
 

भाजपचे या बंडखाेरांना अजूनही पक्षाचे अभय
डॉ. मधू मानवतकर (भुसावळ), अनिल चौधरी (रावेर), अमोल शिंदे (पाचोरा), संजय देशमुख (दिग्रस), राजू तोडसाम (आर्णी), सीमा सावळे (दर्यापूर), राजू बकाणे (वर्धा), विनोद अग्रवाल (गोंदिया), संतोष जनाटे (बोईसर), नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), अतुल देशमुख (खेड आळंदी), मनोज घोरपडे (कराड उत्तर), राजन तेली (सावंतवाडी), रणजित देसाई (कुडाळ), निशिकांत पाटील (इस्लामपूर), सम्राट महाडिक (शिराळा), डॉ. रवींद्र आरळी (जत) आणि मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), राजू शिंदे (आैरंगाबाद पश्चिम).
 

काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीतील या बंडाेबांना अभय
श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंविराेधात बंडखाेरी करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष दानिश लांबे, म्हसळा काँग्रेस अध्यक्ष मुईज शेख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. परंतु पेणमध्ये बंडखाेर नंदा म्हात्रे व अलिबागच्या श्रद्धा ठाकूर यांच्यावर मात्र कारवाई झाली नाही. पंढरपूरमध्ये बंड करणारे शिवाजीराव काळुंगे यांच्यावर काॅंग्रेसने कारवाई केली आहे.