आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्थेसाठी अनेक उपाय : निर्मला सीतारमण

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत माेदी सरकारने मरगळ आलेल्या अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यासाठी सरकारने कंपनी करात कपात केली. बँकांच्या विलीनीकरणाची घाेषणा केली. याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात कर्ज मेळावे भरवण्यात आले. एवढे करूनही सरकारला अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. असे असले तरी सरकार आगामी काही दिवसांत पुन्हा महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते, असे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी दिले.

दुसऱ्या तिमाहीत विकास दर सहा वर्षांच्या नीचांकी ४.५ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. हा पहिल्या तिमाहीत ५ टक्के राहिला हाेता. राजधानी दिल्लीत आयाेजित एका कार्यक्रमानंतर सीतारमण यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेला प्राेत्साहन देण्यासाठी सरकारने ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये अनेक पावले उचलली आहेत. याशिवाय विक्री, खर्चाला प्राेत्साहन देण्यासाठी सरकारी बँकांनी गेल्या २ महिन्यांत देशात जवळपास ५ लाख काेटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

सीतारमण म्हणाल्या, विक्रीला प्राेत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. पायाभूत सुविधांवर खर्च हाेऊ शकेल, यासाठी आम्ही सरळ मार्ग अंगीकारत आहाेत. यामुळे काेअर इंडस्ट्री, कामगार तसेच आणखी काही क्षेत्रांना मदत मिळेल. आर्थिक हालचालींना प्राेत्साहन देण्यासाठी आणखी काेणत्या उपयांची घाेषणा केली जाईल, या प्रश्नावर सीतारमण म्हणाल्या, सरकार अनेक उपायांवर काम करत आहे. वस्तू व सेवा कर(जीएसटी) दर आराखड्यावर जीएसटी परिषद निर्णय घेणार आहे. या दरांची फेररचना होईल.

जीडीपीत घसरण

देश आर्थिक मरगळीच्या टप्प्यातून जात असताना निर्मला सीतारमण यांनी हे वक्तव्य केले आहे. नुकतेच दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपी आकडेवारीत वृद्धी दरात सतत घट हाेत असल्याचे दिसून आले. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर ४.५ टक्के दराने वाढला. याआधीच्या पहिल्या तिमाहीत हा आकडा ५ टक्के हाेता.
 

बातम्या आणखी आहेत...