आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दाेषही नाहीत; परंतु ट्रम्प यांचा निवडणुकीचा मार्ग माेकळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे २४ मार्चला त्यांच्या फ्लोरिडामधील पाम बीचमध्ये गोल्फ खेळल्यानंतर आराम करण्यास जात असताना त्यांना दिलासा देणारे वृत्त मिळाले. विशेष वकील रॉबर्ट मूलर यांच्या तपास अहवालात २०१६ च्या राष्ट्रपती निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प हे रशियाशी मिलीभगत केल्याच्या आराेपात दोषी आढळले नाहीत. अॅटर्नी जनरल विल्यम बर यांनी ट्रम्पना तत्काळ क्लीन चिट देऊन टाकली. यास ट्रम्प यांचा सर्वात माेठा विजय मानला जात असून, याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची मागणी करणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाची हिंमत खचली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा २०२० च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मार्ग माेकळा झाला आहे.

 

या प्रकरणात बर यांनी अमेरिकी संसदेस (काॅंग्रेस) पाठवलेल्या अहवालाच्या समरीत ट्रम्प यांना तपासात अडथळे आणल्याच्या प्रकरणातून मात्र मुक्त केलेले नाही. मूलर यांनी काेणत्याही निर्णयापर्यंत पाेहाेचण्याऐवजी याचा निर्णय न्याय विभागावर साेडला आहे. व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार या तथ्यामुळे ट्रम्प खूप चिडले आहेत. रशियाने २०१६ ची निवडणूक प्रभावित करण्यासाठी असामान्य माेहीम राबवली हाेती व साेशल मीडियात चुकीची माहिती पसरवण्यात आली. तसेच डेमाेक्रॅटिक पक्षाचे संगणक हॅक केले व ई-मेल पाठवून ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यात मदत केली गेली, असे मूलर यांना या तपासात आढळले. या सर्व प्रकारामुळे ट्रम्प यांचा कार्यकाळ असाधारणपणे घाेटाळ्यांनी कलंकित मानला जाऊ शकताे. एफबीआयचे माजी संचालक असलेल्या मूलर यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे डेमाेक्रॅटिक पक्षाला या तपासातून माेठ्या अपेक्षा हाेत्या. तपासातील निष्कर्ष नाकारणे या पक्षासाठी कठीण जाऊ शकते. महाभियाेग अभियानासाठी १० काेटी डाॅलर्स देण्याची घाेषणा करणारे अब्जाधीश टाॅम स्टेयर यांनी सांगितले की, या अहवालातून काही ठाेस निघेल, असा विचारही केला नव्हता. ट्रम्प यांनी गतवर्षी तपासाच्या वैधतेवर तीव्र टीका केली हाेती. व्हाइट हाऊसचे माजी डेप्यूटी प्रेस सेक्रेटरी राज शहा यांचे म्हणणे आहे की, २०२० ची निवडणूक जवळ येत असताना या निर्णयामुळे ट्रम्प यांना विराेधकांच्या टीकेपासून फायदा मिळेल. तपास पूर्ण हाेईपर्यंत स्वतंत्र मतदारांना आकर्षित करण्यास वेळ मिळेल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प समर्थकांना आहे. मूलर यांच्या अहवालामुळे महाभियाेगाची चर्चा थंडावली आहे. तथापि, अॅटर्नी जनरलवर मूलर यांचा अहवाल प्रसिद्ध करणे व ट्रम्प यांच्या इतर वादग्रस्त प्रकरणांचा तपास करण्याचा दबाव कायम आहे.  

बातम्या आणखी आहेत...