Home | Jeevan Mantra | Dharm | There Are Some Rules of Sleep, Do Not Have Legs on The Door

रात्री झोपताना दरवाज्याकडे पाय करून झोपू नये, पुराण आणि स्मृतिग्रंथांत झोपण्यासंबंधी सांगितले असेच काही नियम

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 11:59 AM IST

खोलीच्या दरवाजाकडे पाय करून कधीही झोपू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले

 • There Are Some Rules of Sleep, Do Not Have Legs on The Door


  जीवन मंत्र डेस्क - ग्रंथांमध्ये रात्री झोपण्याबाबत काही विशेष नियम सांगण्यात आले आहे. मनुष्याने ते नियम लक्षात ठेवावे. हे नियम लक्षात न ठेवणाऱ्या व्यक्तींना जीवनात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. खोलीच्या दरवाज्याकडे पाय करून कधीही झोपू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. अशाप्रकारच्या काही खास गोष्टी इतर धर्मग्रथांत सांगितल्या आहेत.


  1. विष्णुपुराणानुसार पश्चिम किंवा उत्तरेकडे पाय करू झोपू नये. यामुळे आरोग्यासंबंधीच्या अडचणी येत नाहीत.


  2. महाभारतच्या अनुशासन पर्वात सांगितले आहे की, जेवण झाल्यानंतर तोंड स्वच्छ न करता झोपू नये. यामुळे आजारी पडू शकतात आणि घरात दारिद्र्य येते.


  3. मनु आणि अत्रिस्मृतिमध्ये सांगितले की, ओले पाय ठेवून झोपल्याने लक्ष्मी नाराज होते. यामुळे ओले पाय ठेवून झोपू नये.


  4. धर्मसिंधु ग्रंथात सांगितले आहे की, झोपताना तोंडात पान किंवा अशाप्रकारची कोणती गोष्ट तोंडात ठेवू नये. याशिवाय कपाळावरील टिळा किंवा कुंकू काढले काढावे. टोपी किंवा पगडी परिधान करून झोपू नये.


  5. गौतमधर्मसुत्रांनुसार कपडे परिधान न करता झोपू नये. असे केल्याने दोष लागतो आणि घरात दारिद्र्य येते.

Trending