आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यास नुकसान पोहोचवू शकतात हे तीन प्रकारचे ज्यूस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांना ज्यूस प्यायला खूप आवडते आणि ते वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिणे पसंत करतात. मात्र, काही असे फळ आहेत ज्यांचा ज्यूस पिल्याने शरीलाला कोणत्याही प्रकारचा फायदा तर होत नाही, पण जास्त काळ पिल्याने नुकसान होऊ शकते. या फळांचा ज्यूस पिण्याऐवजी त्यांचे फळ म्हणून सेवन करणे अधिक फायद्याचे ठरते.

1. अननसाचा ज्यूस
अननसाचा ज्यूस आंबट-गोड असल्याने सर्वांनाच आवडतो. यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने तुमच्या शरीराची ब्लड शुगर लेव्हलही वाढू शकते. तथापि, अननसामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि पोषक द्रव्ये आढळतात. मात्र, ज्यूस काढताना तो पूर्णपणे नष्ट होतात. त्यामुळे अननसाचा ज्यूस पिण्याऐवजी त्याचे फळाच्या रूपात सेवन करावे.

2. सफरचंद ज्यूस
दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते, परंतु याचा ज्यूस तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतो. वस्तुत: सफरचंदाच्या रसात त्याच्या बियादेखील असतात. या बियांमध्ये असलेले अॅमिग्डॅलिन केमिकल शरीराला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. सफरचंदाचा रस घरी बनवत असाल तर याच्या बिया काढूनच तयार करावे.

3. नाशपातीचा ज्यूस
आंबट-गोड असल्याने नाशपातीमध्ये अँटीऑक्सीडंट्स व मिनरल्स असतात. तसेच याचा ज्यूस आरोग्यासाठी फायद्याचा नसतो. कारण यात असलेली सॉर्बिटोल शुगर शरीरात सहजपणे पचत नाही. याचा ज्यूस पिल्याने अपचन होते.तसेच गॅस किंवा वेदना होऊ शकतात. नाशपाती फळ म्हणून खाणे फायद्याचे आहे.

बातम्या आणखी आहेत...