आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेश प्रक्रियेत असाही बनवा-बनवी करण्याचा प्रयत्न; तीनशे अर्ज करण्यात आले बाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांकडून आलेल्या अर्जांमध्ये करण्यात आलेल्या बनवाबनवीचा प्रकार समोर आला आहे. काही पालकांनी एक नंबर लागावा आणि आपल्याला हवी ती शाळा मिळावी. यासाठी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली. घरी असतांनाही भाडेत्त्वावर असल्याचे दाखवियाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकाच पाल्याचे दोन तीन अर्ज आल्यानेही ही बाब उघडीकस आली असून  असे तब्बल तीनशे अर्ज जि.प.शिक्षण विभागाने बाद ठरवले असून, एकच अर्ज ग्राह्य धरला आहे.


आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे. शिक्षणचा अधिकार मिळावा.  यासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल, वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान दोन टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार प्रवेशासाठी जिल्ह्यातील ५९६ शाळांमध्ये पाच हजार ६२७ जागा आहेत. त्यासाठी जिल्ह्यातून एकूण १४ हजार ५१९ अर्ज दाखल झाले आहेत. 

यंदा प्रवेशाचा लकी ड्रॉ राज्यस्तरावर करण्यात आला आहे. ज्यामुळे ज्यांचा पाल्य प्रवेशास पात्र ठरेल त्यांना थेट मेसेज येतील. त्यांनंतर पालकांनी पडताळी करुन प्रवेश शाळेत जावून निश्चित करायचे आहे. परंतु  अनेक पालकांनी आरटीई नियमांना डावलून प्रवेश मिळावा या अपेक्षेत चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आले आहे.  एकापेक्षा जास्त अर्ज पालकांनी भरले. त्यामध्ये एकाच मुलाचे नाव बदल करुन अर्ज भरणे, पत्ता बदलणे, शाळेच्या नावात बदल करणे, स्वत:चे घर असतांना देखील भाडेकरुन दाखवणे आदी प्रकार समोर आले आहे.  अशा अर्जांची एकूण संख्या शिक्षण भागातील आकडेवारीनुसार २९९ असून  यापेक्षाही अधिक म्हणजे तीनेशच्या वर अर्ज असण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अर्ज रद्द ठरवण्यात आले आहे. 

 

अर्जांमध्ये २९९ अर्ज डुप्लिकेट आढळून आले आहेत. ते अर्ज बाद ठरवण्यात आले असून एकच अर्ज गृहित धरण्यात आला आहे. तसेच पडताळणी समितीला यादी देवून बर्थ सर्टीफिकेट तपासले जाणार आहे.
संगीता सावळे आरटीई कक्ष समन्वयक