आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय झाला परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांची प्रतिक्रीया

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एनकाउंटरमध्ये चारही आरोपींचा खात्मा

मुंबई- कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.हैदराबाद घटनेतील आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत मांडलं. हैदराबादमध्ये जी घटना घडली होती. त्या घटनेतील चार आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. न्याय देण्याची ही पद्धत नाही. अन्यायकारक पद्धतीने न्याय देणे योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या बलात्काऱ्यांचे एन्काउंटर
 
पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कारप्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला. पोलिस तपासावेळी आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात चौघांचा मृत्यू झाला. पीडितेवर अत्याचार झालेल्या घटनास्थळी चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला.