आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपच्या माध्यमातून मागवलेल्या जेवणाशी संबंध नाही; आयआरसीटीसीकडून खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या. रेल्वे प्रवासात पॅन्ट्रीचे जेवण नको, असेल तर अनेक प्रवासी विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपल्याला हवे असलेले जेवण मागवतात. पण आयआरसीटीसीने नुकतीच याबाबत मार्गदर्शक सूची तयार केली. आयआरसीटीसीकडून सांगण्यात  आले, “ट्रॅव्हल खाना अथवा रेल यात्री’ या सारख्या अॅपच्या माध्यमातून जर तुम्ही जेवण मागवले आणि त्यापासून तुम्हाला काही नुकसान झाले तर त्यास रेल्वे प्रशासन अथवा आयआरसीटीसी जवाबदार नाहीत. कारण हे रेल्वेशी संलग्ननित नाही. जेवणाच्या दर्जाबाबत कोणत्याच प्रकारची गॅरंटी रेल्वे अथवा आयआरसीटीसी यांची नाही, असे आयआरसीटीसीने जाहीर केले.  


देशात रोज सुमारे साडे तीन कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यातील किमान ५० लाख प्रवासी हे पॅन्ट्रीचे अथवा अशा अॅप्सच्या माध्यमातून जेवण घेतात. रेल्वेतल्या खानपानाच्या दर्जाबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनावर अनेक आरोप झाले. कधी जेवणात झुरळ सापडते तर कधी पाल. प्रवाशांच्या टीका सहन करून रेल्वे आता खानपानाचा दर्जा सुधारत आहे. कोलकाता ते दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये ११ प्रवाशांना विषबाधा झाली होती. हे जेवण अॅपच्या माध्यमातून मागवण्यात आले होते,या चा खुलासा नंतर झाला होता. 

 

या अॅपशी रेल्वेचा संबध नाही 
आयआरसीटीसीने “रेल यात्री’, “रेल रसोई’, “खाना गाडी’, “खाना ऑनलाईन’, “फुड इन ट्रेन’, “फुड ऑन व्हील’, “ट्रॅव्हल जायका’, “ट्रेन फुड’ , ट्रॅव्हल फुड, आदी अॅप्सची रेल्वेचा संबध नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता प्रवशांनी या अॅपवरून जेवन मागिवले तर ती रेल्वेची जबाबदारी असणार नाही.