आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिजवी यांनी शनिवारी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची तुलना दहशतवादी संघटना आयएसचा म्होरक्या अबु बकर-अल बगदादीसोबत केलीये. वसीम रिजवी म्हणाले की, आज ओवैसी आणि बगदादीमध्ये काहीच अंतर नाहीये. आयोध्या निकालानंतर ओवैसी म्हणाले होते की, अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने नाखूश आहे. बगदादी याचवर्षी 26 ऑक्टोबरला अमेरिकेने केलेल्या कारवाईत मारला गेला होता.
रिजवी म्हणाले, "आज ओवैसी आणि बगदादीमध्ये काहीच अंतर नाहीये. बगदादी दहशत पसरवण्यासाठी शस्त्रांचा वापर करयचा तर ओवैसी आपल्या भाषणातून दहशत पसरवतात. ते मुस्लिमांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी उत्तेजित करतात. अशा वातावरणात ओवैसी आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी घातली पाहीजे."
ओवैसी दुसरे झकिर नाइक बनत आहेत- सुप्रियो
केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो म्हणाले, "असदुद्दीन ओवैसी दुसरे झकिर नाइक बनत आहेत. जर ते गरजेपेक्षा जास्त बोलत राहीले, तर देशात चुकीच्या घटना घडू शकतात." कटुता पसरवणे देणारे भाषण दिल्याप्रकरणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी झकिर नाइकला मलेशयातून परत आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.