आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-रिक्षा चालवण्यासाठी परवाना काढण्याची आवश्यकता नाही; जिल्हा परिवहन कार्यालयात नोंदणी करून चालवता येणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात ई-रिक्षा बिनापरवाण्याच्या चालवता येतील. लोकांना चांगली परिवहन सुविधा मिळावी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. ई-रिक्षाला जिल्हा परिवहन कार्यालयात नोंदणी करून चालवता येणार आहे.


नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव तयार करून त्याला मंत्रालयाची मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. सध्या दिल्लीसह देशातील सर्व शहरांमध्ये रिक्षा चालवण्यासाठी परमिट काढण्याची व्यवस्था लागू आहे. म्हणजेच मर्यादेपेक्षा जास्त परवाने देता येत नाहीत. त्यामुळेच रिक्षापेक्षा जास्त या परवान्याची किंमत (४ ते ५ लाख रु. पर्यंत) असते.  लोक जुन्या रिक्षाचा परवाना खरेदी करून नवीन रिक्षा घेतात. या कॅपिंग व्यवस्थेला संपवण्यासाठीच मंत्रालयाने ई-रिक्षा आणण्याची तयारी केली आहे. 


मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन व्यवस्थेमुळे परवाना पद्धत संपण्याबरोबरच प्रदूषण कमी करण्यासाठीही मदत मिळणार आहे. वास्तविक ई-रिक्षाचे दर सीएनजी किंवा डिझेल रिक्षापेक्षा दुप्पट (३ ते ३.५ लाख ) असतील. लोक जुन्या रिक्षाच्या परवान्यासाठी ५ ते ६ लाखांपर्यंत देण्यास तयार असतात अशा वेळी ३ ते ३.५ लाख किंमत कमी असेल. याव्यतिरिक्त  या ई-रिक्षा टॅक्सींप्रमाणे कोणत्याही शहरात चालवता येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...