आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजे यांच्या नावाला कुणाचाही विरोध विराेध नाही; शरद पवारांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या कथित बैठकीच्या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकीत उदयनराजे यांच्या नावाला कुणाचाही विरोध नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक होईल आणि सर्वसहमतीने उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही पवार म्हणाले. 


सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी पुण्यात पार पडली. या बैठकीविषयी उलटसुलट मते माध्यमांतून व्यक्त होत होती. त्यावर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान पवार यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला कुणाचा विरोध नाही, हे स्पष्ट करत या संदिग्धतेवर पडदा टाकला. साताऱ्यातील बैठकीत कुणीही उदयनराजे यांच्या नावाला आक्षेप घेतला नाही. बैठका दोन स्तरावंर झाल्या. एक लोकसभेसाठी आणि दुसरी विधानसभेबाबतची. दोन्ही बैठकांत कुठलाही आक्षेप किंवा विरोध व्यक्त झालेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...