आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is No Pollution Spread Across 4 Industries In Tamil Nadu, 94 Of The 6 Industries In Maharashtra Do Not Follow The Rules

तामिळनाडूत १५६ उद्योगांत एकही प्रदूषण पसरवत नाही, महाराष्ट्रात ४६० पैकी १७९ उद्योग नियम पाळत नाहीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये सर्वात जास्त प्रदूषण पसरवणारे उद्योग आहेत. ते प्रदूषण नियंत्रण मानकांचे पालन करत नाहीत. तामिळनाडूत नियम तोडल्याचे एकही प्रकरण नाही. गेल्या आठवड्यात लोकसभेत दिलेल्या माहितीत हे समोर आले. पर्यावरण, वन व जलवायू मंत्रालयाचे राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी ही माहिती दिली. देशात ५१८ उद्योग नियमांकडे डोळेझाक करून प्रदूषण पसरवतात. यापैकी ५० टक्क्यांहून जास्त केवळ महाराष्ट्र व गुजरातमध्ये आहेत. देशात प्रदूषण पसरवणारे ४२६४ उद्योग होते. त्यापैकी ४९६ बंद झाले आहेत. चालू उद्योगांपैकी ५१८ प्रदूषणाशी संबंधित नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे.
 

यूपीत २४ उद्योग बंद करण्याचे आदेश

जम्मू-काश्मीरमध्ये ५५ उद्योग आहेत. यापैकी ५२ उद्योग नियमांचे पालन करतात. यूपीत ८०७ उद्योग आहेत. त्यातील ७८२ उद्योग नियमांचे पालन करतात. २५ नियमांचे पालन करत नाहीत. पालन न करणाऱ्या २४ उद्याेगांना सीपीसीबीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 

 

राज्य         एकूण     नियम तोडणारे     पाहणी    बंदचेे
               उद्योग       उद्योग            झालेले    आदेश
महाराष्ट्र    460           179                 52    31
गुजरात     441             97                 64    24
तेलंगण     279             69                 21    40
झारखंड     79              25                  30    1

 

 

सीपीसीबीचे ३ राज्यांतील ९५  उद्योग बंद करण्याचे आदेश
  राज्य     उद्योग   बंद करण्याचे आदेश  

 तेलंगण    279    40
महाराष्ट्र    460    31
गुजरात    441    24

 

उद्योग नियमांचे जास्त पालन करणारी विविध राज्ये

राज्य    उद्योग    नियम मान्य
तामिळनाडू    156    156
ओडिशा    139    136
छत्तीसगड    143    137
उत्तर प्रदेश    807    782

बातम्या आणखी आहेत...