आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is Only Slowdown In The Country, Only The Growth Rate Has Been Reduced, Says Finance Minister Nirmala Sitharaman Said

देशात मंदीचे सावट नाहीये, फक्त विकासदर कमी झाला आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यसभेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. देशात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. सर्व क्षेत्रात मंदीचे सावट असल्याचे दिसत आहे, पण निर्मला सीतारमण राज्यसभेत म्हणाल्या की, देशात मंदी नाहीये तर विकास दर कमी झाला आहे.

राज्यसभेत भारताच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरू होती. यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण बोलत होत्या. यावेळी सीतारमण म्हणाल्या की, 2009-2014 च्या शेवटपर्यंत भाराताचा GDP 6.4% होता, तर 2014-2019 दरम्यान हा 7.5% वर पोहचला. जर तुम्ही अर्थव्यवस्थेकडे निट पाहाल, तर तुम्हाला कळे की, विकास दर कमी झाला आहे, पण देशात मंदी नाहीये. 

आपण आर्थिक संकटाकडे जात आहोत- काँग्रेस
 
राज्यसभेत दुपारी दोन वाजेपासून देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरू झाली. काँग्रेस नेते आनंद शर्मा चर्चेच्या सुरावातील म्हणाले की, "देशाचा जीडीपी घटत आहे. रोजगार कमी होत आहेत, कंपन्या बंद होत आहेत. देशातील शेतकरी डबघाईत गेला आहे. देशातील गरीब आणि श्रीमंतामधील दरी कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मागच्या वर्षी देशच्या संपतीपैकी 40 टक्के संपत्ती 1 टक्का लोकांकडे होती. यावर्षी तीच संपती 60 टक्के झाली आहे. फक्त विकास दरच कमी झाला नाहीये तर देश खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे."
 

बातम्या आणखी आहेत...