आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात एकच नोंदणी, दुसऱ्या राज्यात गाडीला पुन्हा नोंदणीची गरज नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आता गाडी खरेदी करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन गेल्यास त्याची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसेल. रस्ते परिवहन मंत्रालयाने देशभरात एकच नोंदणी करण्याची तयारी केली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी सर्व राज्यांतून सूचना मागवण्यात येणार आहेत. मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांत हा प्रस्ताव तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर तो केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या पूर्ण प्रक्रियेला सहा महिने लागण्याची अपेक्षा आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार राहिले तर नोव्हेंबरपर्यंत या संबंधीचे नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे. 


मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांतील महसुलात रस्ते कराचा मोठा वाटा असतो. त्यामुळे रस्ते परिवाहन मंत्रालय हा कर राज्यांमध्ये वाटणार आहे. हे वाटप राज्यांमध्ये आधी होणाऱ्या हस्तांतरणाच्या जुन्या आकडेवारीनुसार असू शकते. त्यामुळेच राज्यांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. 
 

सध्या असा आहे नियम
दुसऱ्या राज्यात वाहन खरेदी केल्यास संबंधित जिल्ह्यातून वाहनासाठी एनओसी घ्यावी लागते. संबंधित परिवहन विभाग एनओसी द्यायच्या आधी सर्व जुने ड्यूज क्लीअर करतो. त्यानंतरच ज्या जिल्ह्यात आणि राज्यात वाहन न्यायचे असेल त्या नावाने एनओसी दिली जाते. आधी हे सर्व काम मॅन्युअली होत होते, मात्र आता वाहन-४ सिस्टिम लागू झाल्यानंतर एनओसी स्वत: विभागात पोहोचते. 


हा बदल लागू होईल
नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहनाचा मालक कोणत्याही राज्यात गाडी घेऊन जाऊ शकतो.  सध्या खरेदी करणाऱ्याला आधी वाहन नोंदणी केलेल्या राज्यातील कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात तशा चकरा मारण्याची गरज नवीन प्रणालीमध्ये राहणार नाही. दुसऱ्या राज्यात गाडी विकली तर नवी नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, त्यामुळे त्रास कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...