Home | National | Other State | There is village in Chhatisgarh that name is Rafael

गावाचे नाव राफेल, पण त्यामुळेच आहे त्रस्त; आजूबाजूची गावे थट्टा करतात- काँग्रेस आली तर चौकशी होईल...

मनीष पांडेय | Update - Apr 15, 2019, 09:01 AM IST

छत्तीसगडच्या एका गावात राफेल मुद्दा, पण राजकारणामुळे नाही

  • There is village in Chhatisgarh  that name is Rafael


    महासमुंद - राष्ट्रीय महामार्ग-५३ वर महासमुंदच्या जवळ १३५ किमी दूर १५० कुटुंबांचे गाव आहे. या गावात ना राफेलचा कारखाना येणार आहे ना राफेलमुळे त्याचा फायदा होणार आहे. पण तरीही
    निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मुद्द्यांत राफेल या गावाची समस्या ठरला आहे. त्याचे कारण त्याचे नाव राफेल, म्हणजे रफाल लिहिण्याची दुसरी पद्धत. गावाचे नाव राफेल असल्याने आसपासच्या गावात हे गाव थट्टेचा विषय ठरले आहे. गावातील लोक दुसऱ्या गावात जातात तेव्हा त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतीत. कधी असे बोचरे शब्दही ऐकावे लागतात की, काँग्रेसचे सरकार आल्यास ग्रामस्थांची चौकशी केली जाईल. गावाचे नाव चर्चेत आहे यावर काय वाटते, या प्रश्नावर बुजुर्ग म्हणतात की, चर्चेत आल्याने आम्हाला काय मिळाले? कधी पंतप्रधान किंवा काँग्रेस अध्यक्ष गावात आले असते तर गावाला फायदा झाला असता. गावाचे नाव भलेही चर्चेत असले तरी राजकारणाला ते आकर्षित करू शकले नाही. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पण ग्रामस्थ सांगतात की, कोणताही उमेदवार प्रचाराला आला नाही. भाजपचे कार्यकर्ते आले होते. ग्रामस्थ म्हणतात की, पंतप्रधान कोणीही झाला तरी आम्हाला सिंचन सुविधा हव्या. सध्या पावसाच्या भरवशावर शेती आहे. शेतकरी कुटुंबांना मजुरीसाठी बाहेर जावे लागते.


    गावाचे नाव राफेल कसे पडले हे ज्येष्ठांनाही माहीत नाही. त्यांच्या मते, आधी रायपूर जिल्हा होता, नंतर १९९८ मध्ये महासमुंद जिल्हा झाला. त्यात २१ वर्षांपासून हे गाव आहे. गावात ३५ वर्षांपासून राहणाऱ्या सुकांती बाग म्हणाल्या की, गावाची एवढी चर्चा याआधी झाली नाही. महिला पंच सफेद राणांना सांगितले की, सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होईल तेव्हा त्या म्हणाल्या की, हे आम्हाला माहीत नाही. कारण गावात अशिक्षित आहेत.

Trending