आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन्ही समुदायात बंधुभाव राहील, असे राम मंदिर व्हावे; अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची इच्छा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : अयोध्येत दोन्ही समुदायात बंधुभाव राहील, असे राम मंदिर व्हावे, अशी इच्छा प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी शुक्रवारी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार महोत्सवाच्या उद्घाटनासाठी श्री श्री रविशंकर नागपुरात आले हाेते. कार्यक्रमात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. न्यायालयाबाहेर राम मंदिरप्रकरणी तडजाेड करण्याच्या कामात श्रीश्रींचा पुढाकार हाेता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'अयोध्येत राम मंदिर व्हावे ही संपूर्ण देशाची इच्छा होती. त्या दिशेने आता काम सुरू झाले आहे, याचा आनंद आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. मात्र आपण या समितीत सहभागी होणार नाही, असे रविशंकर यांनी स्पष्ट केले. ज्या प्रकारच्या राम मंदिराची संकल्पना केली होती त्यानुसारच अयोध्येत मंदिर साकार होत आहे. त्यासाठी आपण केलेली शिष्टाई आता फळाला आली, असे ते म्हणाले.


नागपुरात आयाेजित खासदार महाेत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'आर्ट अाॅफ लििव्हंग'चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचे शुक्रवारी स्वागत केले.
 

बातम्या आणखी आहेत...