Maharashtra Crime / बलात्कार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे तसेच 72 तासात पोस्टमॉर्टेम होणे गरजेचे- नीलम गोरे


जालन्यातील तरुणीवर चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता

प्रविण ब्रम्हपुरकर

Aug 31,2019 04:27:23 PM IST

मुंबई- चेंबुरमध्ये जालन्याच्या 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. 7 जुलै रोजी घडलेल्या या घटनेतील पीडितेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर चार अनोळखी तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या घटनेला इतके दिवस उलटूनही गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत. याबाबत विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी घाटी अधिष्ठाता कानन येळीकर यांची भेट घेतली. घडलेल्या प्रकराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे त्या म्हणाल्या.

पीडित तरुणी ही मूळची जालनाची रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी ती मुंबईत आली होती. चेंबुर भागात ती भावासोबत राहत होती. 7 जुलैला मैत्रिणीच्या वाढदिवसाला म्हणून ती घराबाहेर पडली. त्यादिवशी चेंबूरच्या लाल डोंगर भागात तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. या घटनेनंतर तिची मानसिक आणि शारीरिक प्रकृती गंभीर झाल्याने अर्धागवायूचा झटका आल्याचे समजून तिला गावी पाठवण्यात आले. तिथं तिच्यावर उपचार झाले. पण प्रकृतीत सुधारणा झाली नसल्यामुळे तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी चुनाभट्टी पोलिस ठाण्याकडे सोपावण्यात आला आहे.

X
COMMENT