आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितसोबत कधीच वाद नव्हते, संघाचे वातावरण चांगले आहे- विराट कोहली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्यात आणी रोहित शर्मामध्ये कथीतरीत्या असलेल्या वादांच्या अफवांना फेटाळून लावले आहे. विराट आणि रोहित यांच्यातील अंतर्गत वाद विश्वचषकानंतर चव्हाट्यावर आला होता. विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा नाराज होता. विश्वचषकानंतर विराट आणि रोहितमध्ये काहीतरी खटके उडाल्याचं पाहायला मिळत होतं. या सर्वांवर अखेर विराटने मौन सोडलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या मुद्यावर भाष्य केले. तो म्हणाला "जर आमच्यात वाद असता, तर रोहित इतके चांगले प्रदर्शन करू शकला नसता."


वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी आज(29 जुलै) पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्री आणि कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. विश्वचषक संपल्यापासून कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यात वाद असल्याचा चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने विराटसोबतच पत्नी अनुष्काला सोशल मीडियावर अनफॉलो देखील केले होते, त्यामुळे खेळाडूंचा अंतर्गत वाद हा ड्रेसिंगरुमपर्यंत न राहता घरापर्यंत पोहोचला. दरम्यान आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विराटला रोहितसोबतच्या वादावर प्रश्न विचारला. पत्रकारांच्या प्रश्नावर विराटने हा मुद्दाच फेटाळून लावला. "मी देखील याबाबत ऐकून आहे. चांगल्या खेळासाठी ड्रेसिंगरुममधील वातावरण खूप महत्त्वाचे असते. जर हे खरे असते, तर तो इतका उत्कृष्ट खेळ करुच शकला नसता." असे विराट म्हणाला. त्याच्या या उत्तरावरुन त्याच्या आणि रोहितमध्ये कुठलाही वाद नसल्याचे विराटने स्पष्ट केले. विश्वचषकातील पराभवानंतर आज पहिल्यांदाच विराट कोहली अधिकृतरित्या माध्यमांसमोर आला.

बातम्या आणखी आहेत...