आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या उद्योगासाठी तीन वर्षांपर्यंत परवानगीची गरज नसेल; राहुल गांधीचे जाहीरनाम्यात आश्वासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आमच्या पक्षाचे सरकार आल्यास बिझनेस सुरू करण्यासाठी पहिली तीन वर्षे कोणत्याही प्रकारची सरकारी परवानगी घेण्याची आवश्यकताच राहणार नसल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. अशा उद्योगांना बँकेकडून कर्ज सहज मिळेल. स्टार्टअपवर लागणारा “एंजेल टॅक्स’ पूर्णपणे रद्द करण्याचे अाश्वासनही त्यांनी दिले. सध्या एंजेल कर ३० टक्क्यांच्या दराने भरावा लागतो. देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देणे ही काँग्रेसची प्राथमिकता असल्याचे राहुल यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच नवीन व्यवसाय लालफीतशाहीमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार असून त्यामध्ये या सर्व प्रस्तावांचा समावेश असेल, असेही राहुल यांनी सांगितले.  त्यांनी युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत सांगितले की, काँग्रेसचे सरकार आल्यास स्वत:चा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांच्या सर्व चिंता दूर केल्या जातील. त्यांना कोणत्याही सरकारी परवान्याची गरजच राहणार नाही. त्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करून कामाला सुरुवात करावी.  बँकिंग प्रणालीला लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

परवानगी सर्वात मोठा त्रास  
राहुल यांनी सांगितले की, अनेक उद्योजकांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या मनात हा विचार आला. उद्योग सुरू करण्याआधी वेगवेगळ्या संस्थांची परवानगी ही सर्वात मोठी अडचण असल्याचे उद्योजकांनी सांगितले. या संस्था अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात आणि लाचेची मागणी करतात, असेही उद्योजकांनी सांगितले असल्याचे राहुल म्हणाले.  
 

बातम्या आणखी आहेत...