आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • There’s Something Very Weird With This Dam Wall And Goats, The Ystery Behind Why The Fall From The Walls And Die

अविश्वसनीय: उंचच उंच धरणावर दररोज चढायच्या शेळ‌्या, लोक म्हणायचे भूत-पिशाचाचा परिणाम, पण शास्त्रज्ञांना होता वेगळाच संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटली - नॉर्थ इटलीमध्ये खूप दिवसांपासून एका धरणाला लोक भुताटकीची जागा समजत होते. वास्तविक, धरणाजवळ राहणाऱ्या जंगली शेळ्यांचा दररोज मृत्यू व्हायचा. महिन्यातून अनेक वेळा येथे डझनभर मृत शेळ्या आढळायच्या. तपासात कळले की, या शेळ्या धरणाच्या उंचच उंच भिंतीवर चढायच्या आणि तेथून खाली पडून मरायच्या. पण शेळ्या असे का करत होत्या, हा प्रश्न गूढ बनून राहिला होता. तेथे खरेच एखादी शक्ती होती जी शेळ‌यांना आकर्षित करत होती? 

 

तपासात समोर आले हे सत्य...
- शेळ्यांच्या मृत्यूवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी मृत शेळ्यांचे पोस्टामॉर्टम केले, परंतु रिपोर्ट ठीक निघाली. त्यात असे काहीही नव्हते, ज्यावरून संशय घेता येईल.

- मग एक्सपर्ट्सच्या टीमने सिंगिनो डॅमच्या 160 फूट उंच भिंतीवर नजर खिळवली. तपासादरम्यान त्यांच्या डोळ्यांदेखत आणखी एक शेळी खाली पडून मेली. यानंतर तज्ज्ञांना यामागचे कारण समजून आले.

 

शेळ्यांना लागले होते व्यसन
- तपासात आढळले की, शेळ्यांना या भिंतीवरील एका विशिष्ट प्रकारचे मीठ सॉल्टपीटरला (पोटेशियम नायट्रेट) चाटायला यायच्या. शेळ्यांना धरणाच्या भिंतीतून हे मीठ आणि अनेक प्रकारचे मिनरल्स मिळत होते. त्यांना याचे एवढे व्यसन लागले होते की, त्या यासाठी 160 फूट उंच डॅमच्या भिंतीवर चढायच्या आणि घसरून त्यांचा मृत्यू व्हायचा.

 

जवळजवळ 90 अंशात आहे भिंत
- येथील स्थानिकांचे म्हणणे आहे की, धरणाची भिंत जवळजवळ 90 अंशांत म्हणजेच सरळ उभी आहे. यामुळे शेळ्या भिंतीवरील मोठ्या दगडांच्या साहाय्याने वर चढायच्या आणि दगड चाटायच्या.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या धरणावरील शेळ्यांचे आणखी काही Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...