Health / थर्माकोलच्या कपात चहा पिणे आराेग्यासाठी घातक, होऊ शकतो कॅन्सर 

जेवढ्या धोक्याचे प्लास्टिक आहे, तेवढ्याच धोक्याचे थर्माकोलचा कपही आहेत. हे पुढे जाऊन कॅन्सरसारख्या आजाराचे कारणदेखील बनू शकतात...

दिव्य मराठी वेब

Jun 15,2019 12:10:00 AM IST

चहाच्या ठेल्यावर किंवा कॅफेत नेहमी लोकांना थर्माकोलच्या कपात चहा किंवा कॉफी पिताना बघितले असेल. बरेच लोक स्टीलच्या किंवा काचेच्या ग्लासमध्ये चहा पिण्याचे टाळतात कारण त्याचे मुख्य कारण ते हायजिनला महत्त्व देतात. आजकाल लोकांच्या घरात होणाऱ्या पार्टी-फंक्शनमध्येदेखील जास्तकरून थर्माकोलच्या प्लेट, वाट्या आणि कपाचा प्रयोग करण्यात येतो, ज्यामुळे भांडी धुण्याच्या झंझटीपासून बचाव होतो. पण तुम्हाला थर्माकोलचा साइड इफेक्ट्स माहीत आहेत का? जेवढ्या धोक्याचे प्लास्टिक आहे, तेवढ्याच धोक्याचे थर्माकोलचा कपही आहेत. हे पुढे जाऊन कॅन्सरसारख्या आजाराचे कारणदेखील बनू शकतात. तर जाणून घेऊ यामुळे होणाऱ्या समस्या.


पोटाची समस्या : पोट खराब होणेदेखील थर्माकोलच्या डिस्पोझेबलचे नियमित वापर करणे असू शकते, कारण हे पूर्णपणे हायजिनिक नसतात. यात गरम वस्तू टाकल्यानंतर यात उपस्थित बॅक्टेरिया यात विरघळतात आणि शरीरात पोहोचून जातात.


अॅलर्जी होऊ शकते
जर तुम्ही नियमित रूपाने प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या कपात चहा, कॉफी किंवा गरम पदार्थांचे सेवन करत असाल आणि तुम्हाला अॅलर्जी झाली तर याचे मुख्य कारण हे कप असू शकतात. बॉडीवर रॅशेज येऊ लागतील आणि हे हळूहळू जास्त प्रमाणात वाढू लागतात. थर्माकोलच्या वापरामुळे झालेल्या अॅलर्जीचे मुख्य कारण गळ्यात दुखणे यापासून सुरू होते.


कर्करोगाची समस्या : विशेषज्ञांचे मानले तर थर्माकोलचे कप पॉलिस्टिरीनपासून बनलेले असतात, जे आमच्या आरोग्यासाठी फारच नुकसानकारक आहे. अशात हे गरजेचे आहे की जेवढे होऊ शकते याचा वापर कमीत कमी करावा. जेव्हा आम्ही थर्माकोलच्या कपात गरम चहा घालून पितो तर याचे काही तत्त्व गरम चहात मिसळून पोटात जातात आणि हे शरीरात जाऊन कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देतात. या कपात उपस्थित स्टाइरीनमुळे तुम्हाला थकवा, अनियमित हार्मोनल बदल, शिवाय अजूनही बऱ्याच समस्या येऊ शकतात.


पचनक्रिया बिघडते
हे कप थर्माकोलद्वारे तयार केले जातात आणि यातून चहा किंवा खाण्याचे सामान बाहेर निघू नये म्हणून यावर वॅक्सचा थर चढवण्यात येतो. जेव्हा आम्ही चहा किंवा कॉफीचे सेवन करतो, तर त्यासबोत वॅक्सदेखील आमच्या बॉडीत जातो. यामुळे आतड्यांची समस्या आणि इन्फेक्शन होण्याचे धोके वाढून जातात. आणि याचा प्रभाव आमच्या पचन तंत्रावरदेखील पडतो.

X
COMMENT