आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडांना दुर्बल बनवतात तुमच्या आहारातील या 3 गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा आपण विचार न करता अशा गोष्टी खातो ज्या हाडांसाठी नुकसानकारक असतात. त्यांना डाएटपासून दूर करणेच फायद्याचे. येथे जाणून घ्या, आहारातील कोणत्या तीन गोष्टी हाडांना दुर्बल बनवतात...

1. मीठ
गरजेपेक्षा अधिक मीठ आपल्या शरीरासोबत हाडांसाठीदेखील नुकसानकारक असते. यामध्ये सोडियम असते जे शरीरातील कॅल्शियमला लघवीद्वारे बाहेर टाकते, यामुळे हाडे दुर्बल बनू शकतात.

 

2. चहा / कॉफी
चहा अथवा कॉफीमध्ये कॅफीन असते जे हाडांसाठी नुकसानदायक असते. यामुळे दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा अथवा कॉफी न पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

 

3. चॉकलेट : चॉकलेटचे गरजेपेक्षा अधिक सेवन करणे देखील हाडांना दुर्बल करू शकते. कारण चॉकलेटमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्झिलेट आणि साखर असते, जी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी करते. म्हणून चॉकलेट कमी प्रमाणातच खाणे अधिक फायदेशीर ठरते.

बातम्या आणखी आहेत...