आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीला आमंत्रण देतात घरातील या 4 चुका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तुनुसार घरामध्ये झालेल्या छोट्या-छोट्या चुका तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतात. वास्तूमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास घरातील दोष वाढतात आणि धन संबंधित अडचणींना सामोरे जावे लागते. येथे उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या वास्तू दोषांमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते...

बेडरूममध्ये आरसा : बेडरूममध्ये पलंगासमोर आरसा लावलेला असल्यास हा वास्तुदोषाचे कारण ठरतो. यामुळे पती-पत्नीमधील तणाव वाढतो आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर याचा वाईट प्रभाव पडतो. बेडरूममध्ये आरास असल्यास रात्री झोपताना त्यावर पडदा टाकावा.

आलमारी उघडी ठेवणे : घरामध्ये उघडी आलमारी ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचे विचारही नकारात्मक होऊ शकतात. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही. कामामध्ये मन एकाग्र होत नाही.

बीमखाली ठेवलेला पलंग : एखादा व्यक्ती बीमखाली ठेवलेल्या पलंगावर झोपत असेल तर त्याला तणावाला सामोरे जावे लागते. वास्तुनुसार बीमखाली पलंग ठेवणे चुकीचे मानले जाते. अशा पलंगावर झोपल्याने व्यक्तीचा थकवा दूर होत नाही.

तिजोरी रिकामी ठेवणे : तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल तर ती कधीही रिकामी ठेवू नये. घरामध्ये रिकामी तिजोरी ठेवल्याने बरकत नष्ट होते. यामुळे तिजोरीत थोडेफार पैसे किंवा दागिने ठेवावेत.

बातम्या आणखी आहेत...