धर्म-कर्म / सुखी आयुष्यासाठी प्रत्येकाने अवश्य करावीत ही 5 कामे

ही पाच कामे केल्यास तुम्हालाही दिवसभराच्या कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते

रिलिजन डेस्क

Feb 08,2020 12:10:00 AM IST

असे मानले जाते की, दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊनच हिंदू धर्मामध्ये पाच कामे सकाळी-सकाळी करण्याची प्रथा करण्यात आली आहे. ही पाच कामे केल्यानंतर तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये यश प्राप्त होते आणि आर्थिक लाभ होण्याचे योग जुळून येतात.


स्नान -

रात्री शरीर अपवित्र होते, यामुळे स्नान करून स्वतःला पवित्र करणे खूप आवश्यक आहे. स्नान केल्याने शरीरासोबत मनही पवित्र होते. जो व्यक्ती स्नान केल्यानंतर स्वयंपाकघरात जातो किंवा घराबाहेर पडतो, त्याच्यावर देवता नेहमी प्रसन्न राहतात आणि त्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होते.


दही खाऊन घराबाहेर पडावे..

घरातून बाहेर पडण्यापूर्वी दह्याचे सेवन अवश्य करावे. ही प्रथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. दह्याला पवित्र मानले जाते. दह्याच्या पवित्रते आणि चवीमुळे मन प्रसन्न राहते. याच कारणामुळे पूजन सामग्रीमध्ये दह्याला विशेष स्थान प्राप्त आहे. दही खाल्ल्याने विचार सकारात्मक बनतात आणि नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते.


देवी-देवतांचे नियमित दर्शन घ्यावे

घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा यांचे दर्शन घेऊन यशासाठी प्रार्थना करावी. घरातील देवी-देवतांच्या कृपेने निश्चितच व्यक्तीचा दिवस शुभ होतो. देवाची कृपा राहते आणि अशुभ काळ दूर होतो. देवघराची नियमित साफ-सफाई करावी. सकाळी आणि संध्याकाळी न चुकता देवघरात दिवा लावावा. या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास तुमच्या घरात सदैव सकारत्मक उर्जा राहील. वातावरणातील नकारात्मक उर्जा सक्रिय होणार नाही.


तुळशीची पूजा करावी आणि पानांचे सेवन करावे...

तुळशीचे रोपं प्रत्येकाच्या घरात असतेच. शास्त्रानुसार तुळशीला पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. ज्या घरामध्ये तुळशीची नियमित पूजा केली जाते, त्या घरावर महालक्ष्मीची सदैव कृपा राहते. तुळस ही एक औषधीय वनस्पती आहे. दररोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास विविध आजारांपासून आपले रक्षण होते.


आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा...

दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद आवश्य घ्यावा. ज्या लोकांवर त्यांचे आई-वडील प्रसन्न राहतात, त्यांच्यावर सर्व देवी-देवता प्रसन्न राहतात. याउलट जे लोक आई-वडिलांचा मान-सन्मान करत नाहीत त्यांना सतत दुःख प्राप्त होते. यामुळे घरातून बाहेर पडताना नियमितपणे आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. आई-वडिलांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारचे दुःख, संकट, अडचणी दूर होतात आणि कामामध्ये यश मिळण्याचे योग तयार होतात.

X