सुकामेवा / दररोज अक्रोड खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

अक्रोडचे नियमित सेवन केल्यामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होतात

रिलिजन डेस्क

Nov 05,2019 12:25:00 AM IST

अक्रोड हा सुकामेव्यातील एक प्रमुख प्रकार आहे. सामान्यतः अक्रोड सुकामेव्यात मिसळून खाल्ले जातात. मात्र अक्रोडचा वापर अनेक पदार्थांमध्ये समावेश केलेला असतो. अक्रोड केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आइस्क्रीममध्ये केला जातो. अक्रोडमुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते. याशिवाय अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. याशिवाय अक्रोडचे तेलदेखील त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाते. तसेच अक्रोडच्या कच्च्या फळापासून मुरब्बा, चटणी, सरबत तयार केले जाते. अक्रोडचे नियमित सेवन केल्यामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होतात. यासाठीच दररोज मूठभर सुकामेव्यामध्ये अक्रोडचा समावेश जरूर करा.


ह्रदयविकाराचा धोका कमी होतो : अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. अक्रोड खाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. अक्रोडमुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही ज्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी होतो.


वजन नियंत्रणात राहते : आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अक्रोडमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहींनी अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.


मेंदूचे कार्य सुरळीत होते : अक्रोड हे फळ आकाराला मेंदूच्या आकाराप्रमाणे दिसते. पण एवढंच नाही दररोज अक्रोड खाण्यामुळे तुमच्या मेंदूचे कार्यदेखील सुरळीत होऊ शकते. अक्रोडमध्ये असे काही आरोग्यदायी घटक असतात ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. शिवाय निर्णयक्षमता, एकाग्रता आणि पटकन निराश होण्याची सवय यामुळे कमी होते. तुम्हाला त्वरित उत्साही वाटू लागते. म्हणूनच जेव्हा तुम्हाला निराश आणि उदास वाटतं तेव्हा अक्रोड खाण्याची सवय लावा.


कॅन्सरचा धोका कमी होतो : अक्रोडमधील अँटि ऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सरच्या रोगापासून तुमचे रक्षण होऊ शकते. आजकाल या रोगाचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे जर तुम्हाला यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर दररोज सकाळी सुकामेवा सेवन करण्याची सवय लावा. सुकामेव्यामध्ये इतर पदार्थांसोबत अक्रोडचा समावेश जरूर करा.


शूक्राणूंची संख्या वाढते : अक्रोड खाण्यामुळे पुरुषांच्या शूक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढते. बऱ्याचदा स्पर्म काऊंट कमी असल्यामुळे पुरुषांमध्ये वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज अक्रोड अवश्य खा.


केस आणि त्वचेसाठी उत्तम : अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. यासाठी चेहरा आणि केसांना आठवड्यातून एकदा अक्रोडचे तेल लावा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा दिसून येईल.


अक्रोडच्या पानांचा असा करा उपयोग : जर तुमच्या त्वचेवर जळजळ, वेदना, सूज येत असेल त्यावर अक्रोडच्या पानांचा लेप लावल्यास चांगला फायदा होतो. अक्रोडची पाने चावून खाण्याने दातदुखीच्य समस्या कमी होतात.

X
COMMENT