आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिरण्याची आवड असेल तर या आहेत नोकऱ्या; जाणून घ्या संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवासाची आवड असणाऱ्यांना संगणकासमोर आठ तास बसणे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये ९ ते ५ अशी नोकरी करणे हा चांगला पर्याय ठरत नाही. तसे पाहता असे लोक प्रवास करतानाच आपले कामही चांगल्या प्रकारे करू शकतात. कदाचित तुम्हीही अशा पर्यायाबाबत विचार करत असाल की, ज्यात फिरण्यासह कामाची संधी मिळावी आणि मेहनतीची कमाई प्रवासात खर्चही करावी लागू नये, तर विश्वभ्रमंतीसह कमाई करण्याची संधी असणाऱ्या अशा अनेक नोकऱ्या आहेत.

 

इव्हेंट कोऑर्डिनेटर 
इनडीड या करिअर वेबसाइटवर ट्रेड शो कोऑर्डिनेटर जॉब सर्च केल्यावर त्याच्या उत्तरात विविध शहरांत १५०० पेक्षाही जास्त नोकऱ्या समोर येतात. इव्हेंट कोऑर्डिनेटर लग्न, पार्टी अशा स्थानिक उपक्रमांत काम करू शकतात. प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी फेस्टिवल   ट्रेड शो इव्हेंटचे आयोजन करणे हाही चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला देश-विदेशात फिरण्याची व इव्हेंट्स आयोजनाची संधी मिळू शकते. 

 

भाषा शिक्षक
भारतात किंवा भारताबाहेर सर्व जागी ईएसएल (इंग्लिश एज अ सेकंड लँग्वेज) शिक्षकांना मोठी मागणी असते. दुसऱ्या देशात किंवा ठिकाणी भाषा शिक्षक म्हणून काम कराल तेव्हा तुम्हाला तेथील मूळ भाषा आणि संस्कृती समजून घेण्याची संधी मिळेल. त्यासाठी इंग्रजीत पदवीधर असणे गरजेचे आहे.

 

इंटरनॅशनल अॅड वर्कर 
प्रवास करत असताना लोकांचे आयुष्य चांगले करायचे असेल तर तुम्ही स्वत:ला एखाद्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मदत संघटनेशी जोडून घेऊ शकता. या नोकरीसोबतच तुम्ही अशा देशांतही जाऊ शकता, जे नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनांसारख्या कठीण परिस्थितींतून जात आहेत. त्यासाठी विशेषत : आरोग्य, कृषी किंवा समाज कार्यात तुम्हाला आवड असणे अत्यंत गरजेचे आहे. 

 

ट्रॅव्हलिंग नर्स
या नोकरीत तुम्हाला अनेकदा स्थान बदलावे लागते. त्यात तुम्हाला देशाच्या वेगवेगळ्या भागांत जावे लागते. या नोकरीत तुमच्या प्रवासाशी संबंधित सर्व खर्च तुमची संस्था देते. मात्र, त्यासाठी तुम्ही नोंदणीकृत परिचर/परिचारिका असणे गरजेचे आहे.

 

ट्रॅव्हल रायटर 
अनेक कंपन्यांत फुल टाइम ट्रॅव्हल रायटरच्या जागाही असतात. त्याशिवाय तुम्ही फ्रीलान्सर म्हणून तुमचे लेख नियतकालिकांसाठी पाठवू शकता. ही पैसे कमावण्याची भलेही सोपी संधी नसेल तरीही तुम्ही प्रख्यात पर्यटनस्थळांबाबत तुमची माहिती, अनुभव आदी लिहू शकता.
 

बातम्या आणखी आहेत...