आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिटी वाजवण्याचे हे आहेत खास फायदे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला आनंद झाला की आपण ओठांनी शिटी वाजवतो, शिटीतून एखादे गाणे गुणगुणतो… मात्र या शिटीचे किती फायदे आहेत तुम्हाला माहिती आहेत का? नाही ना, तर चला मग जाणून घ्या...

ताण कमी होण्यास मदत होते - सध्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकावर ताण हा आहेच… हा ताण कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे शिटी वाजवणे. तुम्हाला ताण आलेला वाटतो आहे तर फक्त शिटी वाजवा. तुम्हाला थोड्याफार प्रमाणात ताणापासून आराम मिळेल आणि समाधान वाटेल.

एन्झायटी कमी होते - पेपर बॅगमध्ये श्वासोच्छ्वास घेणं किंवा एकाच नाकपुडीतून एका वेळी दीर्घ श्वास घेणं आणि सोडणं या एन्झायटी कमी करण्याच्या प्रक्रिया आहेत. श्वासावर नियंत्रण मिळवणं हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही साधी शिटी वाजवूनही श्वासोच्छ्वास नियंत्रित करू शकता. यामुळे फक्त श्वासावर नियंत्रण नाही तर एन्झायटीमुळे उद्भवणाऱ्या मानसिक आणि शारीरिक लक्षणांकडील तुमचं लक्षही विचलित होईल.

मूड सुधारतो - आज माझा मूड नाही, असं तुम्हाला वाटलं तर शिटी वाजवा. शिटी वाजवल्याने आपल्याला एक प्रकारे प्रोत्साहन मिळतं. अशा वेळी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत फेरफटका मारा, पार्कमध्ये जा आणि एकत्रितरीत्या शिट्या वाजवा. यामुळे बघा तुमचा मूड सुधारतो की नाही.

फुप्फुसाचे कार्य चांगले राहते - शिटी वाजवल्याने श्वासोच्छ्वास चांगला होतो, तुमचं फुप्फुस मजबूत होतं. ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी, टिश्यू आणि अवयवाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होताे आणि शरीरातील अनावश्यक कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो.

तरुण दिसता : वाढत्या वयानुसार त्वचा सैल होत जाते. चेहऱ्यावर तोंडाभोवतालची त्वचा आणि हनुवटीचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शिटी मदत करते. त्यामुळे साहजिक तुमची त्वचा सैल होत नाही आणि तुम्ही तरुण दिसता.

बातम्या आणखी आहेत...