आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट, जाणून घ्या लिस्टमध्ये भारत कोणत्या स्थानी आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्‍ली- जगात फिरण्यासाठी पासपोर्ट सगळ्यात महत्वाचे आहेत. पण काही देशांचे पासपोर्ट इतके शक्तिशाली आहेत, की जगात फिरताना तुम्हाला या पासपोर्टमुळे कोणतीच अडचण येत नाहीत. हेनले पासपोर्ट इंडेक्‍सने या वर्षी कोणत्या देशाचा पासपोर्ट सगळ्यात शक्तिशाली आहे, ते सांगितले आहे. या लिस्टनुसार जापान आणि सिंगापूरचे पासपोर्ट सगळ्यात शक्तिशाली आहेत कारण या पासपोटर्मुळे तुम्ही विजाशिवाय 189 देशात प्रवास करू शकता.


याआधी 2018 मध्ये जर्मनीच्या पासपोर्टला सर्वात शक्तिशाली ठरवले होते. तर या लिस्टमध्ये भारतीय पासपोरट 86व्या नंबरवर आहे आणि त्याचा मोबिलिटी स्‍कोर 58 आहे. मोबिलिटी स्‍कोरचा अर्थ असा होतो की, या पासपोर्टच्या आधारे तुम्ही 58 देशांमध्ये प्रवास करू शकता.


पण फक्त भारतच 86 व्या नंबरवर नाहीये, तर भारतासोबतच मार्टियाना, साओ टोम आणि प्रिंसिपेदेखील आहेत. या लिस्टमध्ये 199 पासपोर्ट आणि 227 पर्यटण स्थळांचा उल्लेख आहे.


या लिस्टमध्ये यूनाइटेड किंगडम, अमेरिका, बेल्जियम, कॅनडा, ग्रीस, आयरलंड आणि नॉर्वेसहित आठ देश सहाव्या नंबरवर आहेत. तर डेनमार्क, इटली आणि लग्‍जमबर्ग तिसऱ्या स्थानावर आहेत आणि फ्रांस, स्‍पेन आणि स्‍वीडन चौथ्या नंबरवर आहेत. 

बातम्या आणखी आहेत...