आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खान 23 तर दीपिका पदुकोण भरते 13 लाख रुपये विजेचे बिल, करीनाच्या पतीपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत, प्रत्येक महिन्याला लाखों रुपयांचे इलेक्ट्रिसिटी बिल भरतात हे 7 बॉलिवूड स्टार्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोण, सलमान खानपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्व आपले घर सजवण्यासाठी विजेवर करतात लाखों रुपये खर्च. आता शाहरुख खानचेच घ्या त्याच्याकडे मुंबई, दुबई आणि लंडनमध्ये 3 तीन सुसज्ज घरे आहेत. सोबतच मुंबईजवळ अलीबागमध्ये एक शानदार फॉर्महाउसही आहे. यामधील 'मन्नत' नावाचा एक बंगला आहे जेथे शाहरुख राहतो, तेथील महिन्याचे विजेचे बिलच 43 लाख रुपये येते. तसे केवळ शाहरुखच नाही तर आणखी 6 बॉलिवूड स्टार्स आहेत, ज्यांचा महिन्याचा विजेचा खर्च लाखांत असतो. 

 

एक नजर टाकुयात स्टार्सच्या महिन्याच्या विजेच्या बिलावर...
1. सलमान खान.. 

बॉलिवूडचे दबंग म्हणजेच सलमान खानविषयी बोलायचे तर तो आपल्या फॅमिलीसोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. रिपोर्ट्सनुसार, सलमान प्रत्येक महिन्याला 23 लाख रुपयांचे विजेचे बिल भरतो. सलमान लवकरच 'भारत', 'वॉन्टेड-2' आणि 'दबंग-3' मध्ये दिसणार आहे. 

 

2. दीपिका पदुकोण... 
14-15 नोव्हेंबरला इटलीमध्ये रणवीर सिंहसोबत लग्न केलेली दीपिका मंथली 13 लाख रुपये विजेचे बिल पे करते. लग्नानंतर आता दीपिकाने मेघना गुलजारची फिल्म 'छपाक' साइन केली आहे. 

 

3. सैफ अली खान... 
सैफ अली खान केवळ आपल्या केबिनचेच 30 लाख रुपये महिन्याचे बिल भरतो जे कुणाच्या बंगल्याच्या बिलापेक्षाही जास्त आहे. यापूर्वी सैफला फिल्म 'बाजार' मध्ये पहिले गेले होते. जी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाली होती. 

 

4. अमिताभ बच्चन... 
अमिताभ आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत जुहूचा बंगला 'जलसा' मध्ये राहतात, ज्याचे मंथली बिल सुमारे 22 लाख रुपये येते. अमिताभ यांना यापूर्वी 'ठग्स ऑफ हिंदोस्तां' मध्ये पहिले गेले होते. 

 

5. आमिर खान... 
आमिर आपल्या वांद्र्याच्या अपार्टमेंटमध्ये महिन्याचे सुमारे 22 लाख रुपायांची वीज वापरतो. आमिर लवकरच पुन्हा एकदा टीव्ही शो 'सत्यमेव जयते' होस्ट करताना दिसणार आहे. 

 

6. कतरिना कैफ... 
कतरिना आपल्या मुंबईतील घराचे प्रत्येक महिन्याला 10 लाख रुपये विजेचे बिल भरते, जे या लिस्टमध्ये सर्वात कमी आहे. कतरिना लवकरच सलमान खानसोबत फिल्म 'भारत' मध्ये झळकणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...