आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 वर्षांची झाली सुष्मिता, पस्तीशी-चाळीशी ओलांडलेल्या या 10 अॅक्ट्रेसेस आहेत Unmarried

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणा-या सुष्मिता बॉलिवूडमध्ये हवे तसे यश मिळवता आलेले नाही. सुश्मिता वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरसुद्धा अद्याप सिंगल आहे. पण ती दोन मुलींची आई आहे. 2000 साली सुष्मिताने मुलीला दत्तक घेतले होते. त्या मुलीचे नाव रिनी असून ती आता 18 वर्षांची झाली आहे. त्यानंतर जानेवारी 2010 मध्ये सुश्मिताने आणखी एका मुलीला दत्तक घेतले. त्यावेळी ती केवळ तीन महिन्यांची होती. अलीशा हे त्या मुलीचे नाव असून तीदेखील आता 8 वर्षांची झाली आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या अद्याप अविवाहित आहेत.

 

नगमा - 43 वर्षे 
अभिनेत्री नगमा आता 4३ वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. 90च्या दशकातील 'बागी: अ रिबेल फॉर लव्ह' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या नंदिता मोरारजी अर्थातच नगमाने बॉलिवूडसह तामिळ, तेलुगु आणि भोजपूरी सिनेमांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. 'सनम बेवफा' (1992), 'पुलिस और मुजरिम' (1992), 'किंग अंकल' (1993), 'सुहाग' (1994), 'कुंवारा' (2000), 'एक रिश्ता' (2001), 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' (2004) सह ब-याच चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. 2007 साली आलेल्या बॅक टू हनीमून या चित्रपटात ती शेवटची मोठ्या पडद्यावर झळकली होती. माजी क्रिकेटर सौरव गांगूलीसोबत तिच्या प्रेमकथेची माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली होती. याव्यतिरिक्त भोजपूरी अभिनेता रवी किशनसोबतही तिचे नाव जोडण्यात आले होते.

 

सुश्मिता आणि नगमा यांच्याव्यतिरिक्त कोण आहेत वयाची पस्तीशी आणि चाळीशी ओलांडलेल्या अविवाहित अभिनेत्री जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...

 

बातम्या आणखी आहेत...