आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्र हिट चित्रपट दिल्यानंतर पुन्हा कधीही पडद्यावर दिसल्या नाहीत बॉलिवूडच्या या 8 जोड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी एकत्र पहिला हिट चित्रपट दिला पण नंतर मात्र त्या जोड्या पुन्हा पडद्यावर एकत्र दिसल्या नाहीत. असाच एक स्टार आहे शाहरुख खान. येत्या 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख वयाची 53 वर्षे पूर्ण करणार आहे.  1997 साली आलेल्या 'परदेस' या चित्रपटात शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन स्पेस शेअर केला. पण नंतर मात्र ही जोडी पुन्हा कधीही पडद्यावर दिसली नाही. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या या चित्रपटाद्वारे महिमाने  बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच आणखी काही जोड्यांविषयी सांगत आहोत. 


अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता शाहरुख खान 'झीरो' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तर महिमा चौधरीकडे सध्या एकाही चित्रपटाची ऑफर नाहीये. ती अखेरची 2016 साली आलेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटात झळकली होती. 


पुढे वाचा, अशाच आणखी काही जोड्यांविषयी, ज्या केवळ एकाच चित्रपटात झळकल्या...  

बातम्या आणखी आहेत...