Home | Gossip | These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

बॉलिवूडच्या चित्रपटांनी या 8 हॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर्स केले आहेत COPY

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:58 PM IST

आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूडच्या कॉपीकॅट चित्रपटांविषयी सांगत आहोत.

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  साऊथचा सुपरस्टार प्रभास लवकरच 'साहो' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाचे पोस्टर 'ब्लेड रनर 2049' या हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूडमध्ये यापूर्वी अनेक चित्रपटांचे पोस्टर्स हे हॉलिवूड चित्रपटांच्या पोस्टरवरुन तयार करण्यात आले आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूडच्या कॉपीकॅट चित्रपटांविषयी सांगत आहोत.


  'बॅटमॅन बिगेन' या हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी आहे 'रा-वन'चे पोस्टर...
  2005 मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या 'बॅटमॅन बिगेन' या चित्रपटाचे पोस्टरवरुन शाहरुख खानच्या रा-वन या चित्रपटाचे पोस्टर तयार करण्यात आले आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित रा-वन हा चित्रपट 2011मध्ये रिलीज झाला होता.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूडच्या आणखी 7 कॉपीकॅट चित्रपटांविषयी...

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  'द ग्रॅजुएट' आणि 'एतराज'चे पोस्टर 

  1967 साली आलेल्या डायरेक्टर माइक निकोल्सच्या 'द ग्रॅजुएट'च्या पोस्टरची कॉपी आहे 2004 मध्ये आलेल्या डायरेक्टर मस्तान-अब्बासच्या 'एतराज'चे पोस्टर. 

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  'द बेस्ट ऑफ मी' आणि 'दिलवाले'चे पोस्टर 
  2014 साली रिलीज झालेल्या दिग्दर्शक मायकल होफमॅनच्या 'द बेस्ट ऑफ मी' या हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टवरुन दिलवाले या चित्रपटाचे पोस्टर तयार करण्यात आले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा दिलवाले हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता.  

   

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  'हल्क' आणि 'गजनी'चे पोस्टर 
  2003 साली आलेल्या डायरेक्टर एंग लीच्या 'हल्क' हा चित्रपटाच्या पोस्टरवरुन गजनी या चित्रपटाचे पोस्टर तयार करण्यात आले होते. दिग्दर्शक ए आर मुर्गदासचा 'गजनी' हा चित्रपट 2008 साली रिलीज झाला होता.  

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  'टायटॅनिक' आणि 'मौसम'चे पोस्टर 
  1997 साली आलेल्या जेम्स कॅमरून दिग्दर्शित 'टायटॅनिक' या चित्रपटाच्या पोस्टरवरुन मौसम या चित्रपटाचे पोस्टर तयार करण्यात आले होते. 2011साली आलेला मौसम हा चित्रपट पंकज कपूर यांनी दिग्दर्शित केला होता.  

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  'जेनीफर'स बॉडी' आणि 'मर्डर-3'चे पोस्टर 
  2009 मध्ये दिग्दर्शक कॅरिन कुसामा यांचा 'जेनीफर'स बॉडी' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या पोस्टरवरुन 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'मर्डर-3'चे पोस्टर तयार करण्यात आले होते. हा चित्रपट विशेष भटने दिग्दर्शित केला होता.  

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  'द रिप्लेसमेंट किलर्स' आणि 'राउडी राठौर'चे पोस्टर 
  1998 साली आलेल्या डायरेक्टर एंटोनी फुक्वांच्या 'द रिप्लेसमेंट किलर्स'च्या पोस्टरची कॉपी आहे 2012 मध्ये आलेल्या डायरेक्टर प्रभु देवाच्या  'राउडी राठौर'चे पोस्टर.  

   

 • These Bollywood Films Posters Are Copied From Hollywood Movies

  'लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चे पोस्टर 
  2011 साली रिलीज झालेला झोया अख्तरचा जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाचे पोस्टर दिग्दर्शक कॅथरीन हार्डविकच्या 'लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन' या हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी आहे. हा हॉलिवूड चित्रपट 2005 साली रिलीज झाला होता.  

   

Trending