आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलपासून होणाऱ हे 5 मोठे बदल, यांमूुळे तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम; जाणून घ्या कोणते आहे ते बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - एप्रिल महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या आयुष्यात सुख आनंद देणार आहेत. एप्रिल महिन्यापासून घर बांधणे स्वस्त होणार आहे. तसेच रेल्वे तिकीटापासून ते विजेच्या मीटरपर्यंत तुम्हाला फायदा होणारे बदल घडणार आहेत. जाणून घेऊयात एप्रिलपासून होणाऱ्या या 5 बदलांबद्दल.... 

 

1. निर्माणाधीन घरे स्वस्त होणार

> 1 एप्रिलपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. यानंतर निर्माणाधीन घरांवर 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. तर स्वस्त दरांतील घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांनी कमी करून 1 टक्का करण्यात आली. यामुळे घरांच्या किंमती कमी होणार आहे. 


2. स्मार्ट प्रीपेड मीटरची होणार सुरूवात 

> 1 एप्रिलपासून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. यानंतर ग्राहकांना मोबाइल रिचार्जप्रमाणेच प्रीपेड इलेक्ट्रिसिटी रिचार्च करता येणार आहे. यामुळे दर महिन्याला वीज भरण्याची सक्ती बंद होईल.  
ग्राहक जेवढा विजेचा वापर करणार तितकेच त्याला रिचार्ज करावा लागेल. 

3. व्याज व्यवस्था बदलणार 
> आरबीआय 1 एप्रिलनंतर नवीन व्याज व्यवस्था लागू करणार आहे. यानंतर गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे नियम बदलण्यात येतील. यानंतर इतर बँकांना आरबीआयने रेपो रेट कमी केल्यास तात्काळ व्याज दर कमी करावे लागणार आहेत. सध्या व्याज दर किती ठेवावा हे बँकेच ठरवते. पण नवीन बदलानंतर हे व्याज दर आरबीआयच्या रेप रेटवर अवलंबून राहतील. 


4. एक पीएनआर होणार जारी

> 1 एप्रिलपासून भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक संयुक्त पॅसेंजर नेम रेकॉर्ड (पीएनआर) जारी करणार आहे. यानंतर प्रवाशांना प्रवासादरम्यान एका नंतर एक दुसऱ्या रेल्वेत प्रवास केल्यानंतर संयुक्त पीएनआर देण्यात येईल. अशातच ज्या यात्रेकरूंना एकाच प्रवासासाठी दोन रेल्वे बुक करायाची आवश्यकता भासते त्यांना आता दोन पीएनआर नंबर जनरेट करण्याची आवश्यकता भासणार नाही.  


5. पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर होणार

> यावर्षी ईपीएफओ देखील मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर नोकरी बदलल्यानंतर तुमचा पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर होईल. या नियमानंतर पीएफ रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी वेगळी विनंती करण्याची आवश्यकता नाही. 

बातम्या आणखी आहेत...