Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | These five things can be put in the wallet to remove the money problem

पैशांची चणचण दूर करण्यासाठी पाकिटात ठेवू शकता या 5 गोष्टी 

रिलिजन डेस्क, | Update - Jul 04, 2019, 12:10 AM IST

शास्त्रानुसार पाकिटात काही खास गोष्टी ठेवल्यास केवळ बरकतच वाढत नाही तर याचे शुभफळ प्राप्त होतात.

 • These five things can be put in the wallet to remove the money problem

  काही काळापूर्वी खिशात पाकीट ठेवणे एक स्टेटस सिम्बॉल मानला जात होता. परंतु सध्याच्या काळात पाकीट जवळ ठेवणे आवश्यक झाले आहे. पाकीट ठेवण्याचे विविध फायदे आहेत, उदाहरणार्थ तुमचे पूर्ण पैसे पाकिटात व्यवस्थित राहू शकतात. तसेच पाकिटात महत्त्वाचे कागदपत्र, डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था असते. पाकीट जवळ असल्यास तुम्हाला पैसे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी खिसे चाचपडावे लागत नाहीत.


  शास्त्रानुसार पाकिटात काही खास गोष्टी ठेवल्यास केवळ बरकतच वाढत नाही तर याचे शुभफळ प्राप्त होतात. पाकिटात अशाही काही वस्तू ठेवल्या जातात, ज्यामुळे नकारत्मक उर्जा निर्माण होते आणि ज्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावे लागते. आज आम्ही तुम्हाला पाकिटात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत यासंदर्भात विशेष माहिती सांगत आहोत.


  देवी लक्ष्मीचा फोटो...
  जर तुम्ही तुमच्या पाकिटात लक्ष्मीचा फोटो ठेवला तर याचे शुभफळ प्राप्त होतात. पाकिटात लक्ष्मीचा फोटो ठेवल्यास बरकत कायम राहते आणि पाकीट रिकामे होत नाही. परंतु लक्ष्मीचा खराब किंवा फाटलेला फोटो पाकिटात ठेवू नये. फाटलेला फोटो नदीमध्ये प्रवाहित करावा.


  पाकिटात आणखी कोणकोणत्या वस्तू ठेवू शकतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • These five things can be put in the wallet to remove the money problem

  पिंपळाचे अभिमंत्रित पान -
  तुम्ही पाकिटात पिंपळाचे अभिमंत्रित केलेले पान ठेवू शकता. धर्म ग्रंथानुसार पिंपळामध्ये भगवान विष्णूचा वास मानला जातो. हे पान पाकिटात ठेवल्यास सकारात्मक उर्जेची जाणीव होते. पिंपळाचे पान अभिमंत्रित करण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पिंपळाचे एक पान तोडून आणून गंगेच्या पाण्याने धुवून, पवित्र करून घ्या. त्यानंतर या पानावर केशराने 'श्रीं' लिहा आणि कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी पाकिटात ठेवा.

 • These five things can be put in the wallet to remove the money problem

  गुरूंचा फोटो -
  अनेक लोक असे आहेत जे गुरूला खूप मानतात. हे गुरु अध्यात्मिक किंवा धार्मिक क्षेत्रातील असू शकतात. तुम्ही तुमच्या पाकिटात स्वतःच्या गुरूंचा फोटो ठेवू शकतात. गुरूंचा फोटो पाकिटात ठेवल्यास याचा सकारात्मक प्रभाव जीवनावर पडेल. गुरूंच्या फोटो पाकिटात असल्यास तुम्हाला बिकट परस्थितीमध्येही अध्यात्मिक शांतीची जाणीव होईल. हा फोटो पाकिटात असल्यास आर्थिक अडचणी दूर होतील.


  तांदळाची पुडी -
  शास्त्रानुसार तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत. जीवनात सुख-समृद्धी व धनाचा कारक शुक्र ग्रहाला मानले जाते. यामुळे प्रत्येक पूजन कर्मात देवी-देवतांना अक्षता स्वरुपात तांदूळ अर्पण केले जातात. लक्ष्मी पूजेमध्ये अर्पण केलेले तांदूळ विशेष मानले जातात. देवी लक्ष्मीला अर्पण करण्यात आलेल्या अक्षतांमधील काही दाणे कागदाच्या पुडीत बांधून पाकिटात ठेवा. या उपायाने तुम्हाला शुक्र ग्रह तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.

Trending