आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामापूर्वी खाऊ शकता हे पदार्थ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा करण्यात आला. याचे मुख्य उद्देश्य चांगल्या आरोग्यासाठी योग्य खानपानाबद्दल लोकांना जागरूक करणे आहे. व्यायाम करण्याअगोदर योग्य खान पानाबद्दलही माहिती असायला पाहिजे. खास करून व्यायाम करण्यापूर्वी पोषक द्रव्ये असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला व्यायामासाठी ऊर्जा तर मिळेलच, पण तुमचे आरोग्यदेखील चांगले राहील.

केळी : केळींमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असत. ते तुमच्या स्नायूंच्या क्रियेसाठी गरजेचे आहे. यातून तुमच्या शरीराला व्यायाम करण्यासाठी गरजेचे कार्बोहाइड्रेट मिळतात.

ओटमिल आणि ब्लूबेरिज : या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये तुमच्या शरीराल प्रोटीन मिळतात. ते व्यायामादरम्यान तुमच्या स्नायूंना सहायक असतात.

लो फॅट चीज : चीजमध्ये प्रोटीन असते. हे प्रोटीन पचवण्यास वेळ लागतो, तसेच शरीराला दीर्घकाळासाठी ऊर्जा मिळते. याशिवाय अॅप्रिकॉट व्हिटॅमिनचा चांगला स्रोत आहे आणि हृदय व हाडांसाठीदेखील फायदेशीर आहे.

अंडी आणि अॅव्हेकॅडो : जर तुमची भूक चांगली असेल तर प्रोटिनासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहील आणि व्यायामासाठी तुम्हाला पूर्ण ऊर्जा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...