Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | these healthy fruit eat at morning

उपाशीपोटी ही 4 फळे खाल्ल्यास नेहमी राहाल निरोगी, हृदय आणि पचनाचे आजारही होतील दूर

हेल्थ डेस्क | Update - Sep 07, 2018, 12:02 AM IST

फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. तसे पाहिले तर फळांचे सेवन करण्याचा परिपूर्ण फायदा

 • these healthy fruit eat at morning

  फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. तसे पाहिले तर फळांचे सेवन करण्याचा परिपूर्ण फायदा ते योग्य वेळी खाल्ल्याने मिळतो. एका संशोधनानुसार अम्लीय फळांचे सेवन जर सकाळच्या वेळी उपाशीपोटी केले तर ते शरीरामध्ये जाऊन क्षारीय होतात. उपाशीपोटी फळे खाल्ल्याने हृदय आणि पचनाशी संबंधित अनेक आजारदेखील दूर होतात.


  सफरचंद
  सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी राहतो. उपाशीपोटी दररोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरामध्ये कँसरचा धोकाही कमी राहतो.


  किवी
  या फळात भरपूर पोषक द्रव्ये असतात. किवीमध्ये संत्र्याच्या तुलनेत दुप्पट व्हिटॅमिन सी आढळते. पोटॅशियम, मॅग्निशियम, फायबर आणि व्हिटॅमिन ईचाही हे फळ चांगला स्रोत आहे. उपाशीपोटी नियमित हे खाल्ल्यास अधिक फायदा मिळतो.

 • these healthy fruit eat at morning

  संत्री 
  संत्रा अम्लीय फळ असून ते शरीरात जाऊन क्षारीय होते. सकाळी उपाशीपोटी आणि दिवसातून चार संत्र्यांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो. मूत्रपिंड आणि मुतखड्याची समस्याही दूर होते. 

 • these healthy fruit eat at morning

  पपई 
  पपईमध्ये कॅरोटिन मोठ्या प्रमाणात आढळून येते. हा घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. उपाशीपोटी पपईचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. याच्या सेवनाने पोटाशी संबंधित रोग दूर होतात. 

Trending