आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे घरगुती आणि सोपे उपाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती असायलाच हवी.

मानवी शरीराला सरासरी किती हिमोग्लोबिनची गरज असते
हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण ग्रॅम अथवा डेसिलिटरमध्ये तपासले जाते. सहा अथवा तीन महिन्यातून डेली रुटीन चेकअप करून शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चेक करता येते. हिमोग्लोबिनचे प्रमाण वय आणि लिंगानुसार निरनिराळे असते. नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण १७ ते २२ असू शकते, लहान मुलांमध्ये हे प्रमाण ११ ते १३ असायला हवे. प्रौढ वयातील महिलांमध्ये याचे हिमोग्लोबिन १२ ते १६ तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १४ ते १८ असणे गरजेचे आहे. मात्र प्रत्येकाच्या आहारानुसार यात कमी जास्त प्रमाण होण्याची शक्यता दाट असते. शरीरात आदर्श हिमोग्लोबिनचे प्रमाण असण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे.

आहारात आवर्जून करा या अन्नपदार्थांचा समावेश

पालक : पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे नियमित पालकची भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. शंभर ग्रॅम पालकच्या भाजीमधून अंदाजे ४ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

बीट : बीटामध्ये फोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी बीट खाण्यामुळे मिळू शकतात. शंभर ग्रॅम बीटामधून जवळजवळ ०.८ मिलीग्रॅम लोह मिळते.

चिकन अथवा मटण : अशक्तपणा झाल्यास त्या व्यक्तीला चिकन अथवा मटणाचे सूप दिले जाते. याचे कारण मटण अथवा चिकनमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर शरीरातील झीज भरून काढण्याची ताकद असते. मात्र मटण अथवा चिकन करताना ते तेलात न करता उकडून अथवा ग्रील करून खावे. शंभर ग्रॅम चिकन अथवा मटणामधून ०.७ ते २.१ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

पीनट बटर : शेंगदाणे अथवा शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर लोह मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दररोज नास्ता करताना ब्रेड आणि पिनट बटर खाऊ शकता. शंभर ग्रॅम पिनट बटर मधून १.९ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

टोमॅटो : टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. शिवाय टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

अंडे : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे ऐकले असेलच. कारण अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. महत्त्वाचे म्हणजे अंडे खाण्यामुळे शरीराला लोह मिळते. एका अंड्यातून १.५९ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.

डाळिंब : डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे शरीराची झिज लवकर भरून निघते. शंभर ग्रॅम डाळिंबाच्या दाण्यातून अंदाजे ०.३ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.

सुकामेवा : निरोगी जीवनशैलीसाठी मूठभर सुकामेवा दररोज खावा असे म्हटले जाते. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळू शकते. शंभर ग्रॅम सुकामेवा खाण्यामुळे शरीराला पुरेसे लोह नक्कीच मिळू शकते.

सी-फूड : सी फूडचे चाहते अनेक असतात. सीफूडमधून लोहदेखील मिळते. कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळेल.

मध : मध शरीरासाठी अतिशय चांगले असते. दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरावर चांगले फायदे होतात. कारण मधामध्ये अनेक पोषकतत्वं असतात. मधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला पुरेशी ऊर्जादेखील मिळते. शंभर ग्रॅम मधामधून शरीराला ०.४ ग्रॅम लोह मिळू शकते.

सफरचंद : 'अॅन अॅपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे' असे नेहमी बोलले जाते. कारण सफरचंदात लोहाचे प्रमाण भरपूर आहे. म्हणूनच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्यास सांगितले जाते. एका सफरचंदातून अंदाजे ०.३१ लोह मिळू शकते.

खजूर अथवा खारीक : गोड चवीचे खजूर अथवा सुकलेले खारीक अनेकांना आवडतात. उपवासाच्या दिवशी अथवा अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जातात. खजूराला यासाठीच सूपरफूड असे म्हटले जाते. खजूरामुळे हिमोग्लोबिन वाढू शकते कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक आहे. एका खजूरामधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय
हिमोग्लोबिन कमी झाल्यावर ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी नैसर्गिक पद्धतीने आणि या घरगुती उपायांनी हिमोग्लोबिनची पातळी वाढवू शकता.

आहारात लोहाचे प्रमाण वाढवा
ज्या लोकांना रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढवायची आहे. त्यांच्यासाठी हा एक साधा आणि सोपा उपाय आहे. लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.

व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवा
अनेक भाज्या आणि फळांमधून नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन सी मिळू शकते. यासाठी आहारात द्राक्षे, संत्री, लिंबू, ब्रोकोली, आंबा, किवी अशा पदार्थांतून व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर मिळू शकते.

आहारात फॉलिक अॅसिडचे प्रमाण वाढवा
फोलेट हे शरीराला आवश्यक असणारे महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. यामुळे शरीरात हेम म्हणजेच लोहाची निर्मिती होण्यास मदत होते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल तर हा उपाय नक्की करा. पालक, तांदूळ, शेंगदाणे, चवळी, राजमा, अॅवोकॅडो आणि लॅट्यूस हे पदार्थ आहात समावेश करून हिमोग्लोबिन वाढवू शकता.

व्यायाम
जे अन्न खाता ते शरीरात शोषले जाणे फार गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर होतो.

बातम्या आणखी आहेत...